नांदेडमध्ये मतदान - परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमे-याचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2017 01:07 PM2017-10-11T13:07:01+5:302017-10-11T13:18:56+5:30

नांदेड महापालिकेच्या २० प्रभागांतील ८१ वॉर्डांसाठी  मतदान सुरु आहे. सकाळी ७:३० ते ११ या वेळेत १८ टक्के मतदान झाले.

Polling in Nanded - Use of drone cameras to monitor the situation | नांदेडमध्ये मतदान - परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमे-याचा वापर

नांदेडमध्ये मतदान - परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमे-याचा वापर

Next

 नांदेड - नांदेड महापालिकेच्या २० प्रभागांतील ८१ वॉर्डांसाठी  मतदान सुरु आहे. सकाळी ७:३० ते ११ या वेळेत १८ टक्के मतदान झाले. गुरुवारी मतमोजणी होईल. बुधवारी सकाळी ७:३० वाजल्यापासून मतदान सुरू झाले. मतदानासाठी २,५०० इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन वापरल्या आहेत. 

१३७ मतदान केंद्रे संवेदनशील घोषित केली आहेत. विविध पक्षांचे ४२३ तर १५५ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. राज्यात पहिल्यांदा वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल अर्थात व्हीव्हीपॅट मशीनचा वापर होणार आहे.

प्रभाग २मधील ३७ मतदान केंद्रांवर या मशिन्स बसविल्या जाणार असून, मतदारांना व्हीव्हीपॅट मशीनवर मतदान बघायला मिळणार आहे. निवडणुकी दरम्यान कुठलाही गैरप्रकार होऊ नये तसेच परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमे-याचा वापर करण्यात येत आहे. 

Web Title: Polling in Nanded - Use of drone cameras to monitor the situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.