पावणेदोन लाखांचा गुटखा पकडला़

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 12:15 AM2019-03-30T00:15:02+5:302019-03-30T00:15:16+5:30

राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची नांदेडात सर्रासपणे विक्री केली जात असून शुक्रवारी अर्धापूर शहरात एका घरावर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने धाड टाकून पावणेदोन लाखांचा गुटखा पकडला़

Pavadon caught the gutkha of lakhs | पावणेदोन लाखांचा गुटखा पकडला़

पावणेदोन लाखांचा गुटखा पकडला़

Next
ठळक मुद्देपावणेदोन लाखांचा गुटखा पकडला

नांदेड : राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची नांदेडात सर्रासपणे विक्री केली जात असून शुक्रवारी अर्धापूर शहरात एका घरावर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने धाड टाकून पावणेदोन लाखांचा गुटखा पकडला़ यावेळी आरोपीने मात्र पलायन केले़ याप्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे़
राज्यात गुटखाबंदीच्या निर्णयानंतरही सर्रासपणे गुटखा आणि सुगंधित तंबाखूची विक्री केली जात आहे़ शेजारील राज्यांतून दररोज नांदेडात गुटख्याची आयात करण्यात येते़ अन्न व औषध प्रशासन, पोलिसांकडून त्यांच्यावर धाडीही घालण्यात येतात़ परंतु गुटखा विक्री व्यवसायावर आळा घालण्यात प्रशासनाला अद्याप यश आले नाही़ गुरुवारी अन्न व औषध प्रशासनाने २६ धाडीमध्ये जप्त केलेला ४० लाख रुपयांचा गुटखा जाळून नष्ट केला होता़ त्यानंतर शुक्रवारी पथकाला अर्धापूर येथील घरात गुटख्याचा साठा असल्याची माहिती मिळाली़ त्यानंतर एफडीएचे प्रवीण काळे, बालाजी सोनटक्के यांनी पोलिसांच्या मदतीने आगरपुरा पाणी टाकीजवळील शेख जावेद शेख अब्बास यांच्या घरावर धाड मारली़ यावेळी घरात विविध ब्रॅन्डचा १ लाख ७४ हजार ९०० रुपयांचा गुटखा आढळून आला़ एफीडीएने हा साठा जप्त केला़ या प्रकरणात आरोपीच्या विरोधात अर्धापूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे़

Web Title: Pavadon caught the gutkha of lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.