नांदेड मनपाच्या ११३ लेटलतिफांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 12:20 AM2018-08-11T00:20:40+5:302018-08-11T00:21:05+5:30

महापालिकेतील लेटलतिफ कर्मचाऱ्यांवर आयुक्त लहुराज माळी यांनी पदभार स्वीकारताच कारवाईचा बडगा उगारला होता़ परंतु, आयुक्तांच्या कारवाईनंतरही ‘हम नही सुधरेंगे’ या भूमिकेत असलेले कर्मचारी मर्जीप्रमाणे वागत आहेत़ शुक्रवारी सहाय्यक आयुक्त अजितपालसिंग संधू यांनी केलेल्या पाहणीत तब्बल ११३ कर्मचारी कार्यालयात वेळेवर उपस्थित नसल्याचे आढळून आले़ या सर्व लेटलतिफ कर्मचाºयांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत़

Notice to 113 passengers of Nanded Municipal | नांदेड मनपाच्या ११३ लेटलतिफांना नोटिसा

नांदेड मनपाच्या ११३ लेटलतिफांना नोटिसा

Next
ठळक मुद्देसहाय्यक आयुक्तांच्या पाहणीत उघड झाला प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : महापालिकेतील लेटलतिफ कर्मचाऱ्यांवर आयुक्त लहुराज माळी यांनी पदभार स्वीकारताच कारवाईचा बडगा उगारला होता़ परंतु, आयुक्तांच्या कारवाईनंतरही ‘हम नही सुधरेंगे’ या भूमिकेत असलेले कर्मचारी मर्जीप्रमाणे वागत आहेत़ शुक्रवारी सहाय्यक आयुक्त अजितपालसिंग संधू यांनी केलेल्या पाहणीत तब्बल ११३ कर्मचारी कार्यालयात वेळेवर उपस्थित नसल्याचे आढळून आले़ या सर्व लेटलतिफ कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत़
महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी लहुराज माळी यांनी सकाळी दहा वाजता कार्यालयात आल्यानंतर कर्मचाऱ्यांचा हजेरीपट ताब्यात घेतला होता़ यावेळी शंभरावर कर्मचारी निश्चित वेळेत कार्यालयात आलेच नसल्याचे स्पष्ट झाले़ त्यानंतर आयुक्तांनी या सर्व कर्मचाऱ्यांना नोटीस बजावून कार्यालयात वेळेवर उपस्थित राहण्याबाबत तंबी दिली होती़ त्यानंतर दुसऱ्यांही दिवशी अनेक कर्मचारी कार्यालयात वेळेवर आलेच नाही़
त्यांनाही नोटिसा बजाविण्यात आल्या होत्या़ त्यानंतर मध्यंतरी कारवाईच्या भीतीने का होईना लेटलतिफ कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली होती़ परंतु, लेटलतिफ कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेत बदल झाला नसल्याचे शुक्रवारी पुन्हा एकदा दिसून आले़
आस्थापना विभागाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त अजितपालसिंग संधू यांनी शुक्रवारी सकाळी दहा वाजता विविध विभागांना भेटी दिल्या़ त्यावेळी ११३ कर्मचारी वेळेत कार्यालयात उपस्थित नसल्याचे आढळून आले़ त्यामध्ये अनेक विभागातील अधिकाऱ्यांचाही समावेश होता़ लेटलतिफ असलेले हे कर्मचारी ११ वाजेनंतर कार्यालयात आले होते़ त्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांना नोटीस बजाविण्यात आली आहे़ कार्यालयीन शिस्त न बाळगणाऱ्या कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचे संधू यांनी स्पष्ट केले आहे़ या कर्मचाऱ्यांचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर तो असमाधानकारक वाटल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे़, असा इशाराही सहाय्यक आयुक्त अजितपालसिंग संधू यांनी दिला आहे़
---
आयुक्तांची दहाला, कर्मचाऱ्यांची साडेअकराला हजेरी
मनपा आयुक्त म्हणून दोन महिन्यांपूर्वी रुजू झालेले लहुराज माळी हे दररोज सकाळी १० वाजता न चुकता कार्यालयात पोहोचतात़ परंतु, महापालिकेचे कर्मचारी, अनेक विभागप्रमुख सकाळी ११ वाजेनंतरच कार्यालयात पाऊल ठेवतात़ खुद्द आयुक्तांनी लेटलतिफांना नोटीस बजावल्यानंतरही त्याचा या कर्मचाऱ्यांवर कुठलाही परिणाम झाला नसल्याचे दिसून येत आहे़

Web Title: Notice to 113 passengers of Nanded Municipal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.