कंत्राट आक्षेपांच्या कचाट्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 12:38 AM2017-11-26T00:38:41+5:302017-11-26T00:38:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड : जिल्हा पुरवठा विभागाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाहतूक कंत्राट आक्षेपांच्या कचाट्यात ...

In the negotiations of contract objections | कंत्राट आक्षेपांच्या कचाट्यात

कंत्राट आक्षेपांच्या कचाट्यात

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हा पुरवठा विभाग : अपात्र निविदाधारकाला पुन्हा पात्र ठरविल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : जिल्हा पुरवठा विभागाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाहतूक कंत्राट आक्षेपांच्या कचाट्यात सापडले आहे. सर्वात कमी दर असलेला निविदाधारकही प्रारंभी अपात्र ठरला होता असा आरोप केला आहे़ या सर्व प्रकरणामुळे ही निविदा प्रक्रिया वादात सापडली आहे़
जिल्हा पुरवठा विभागाने ९ आॅक्टोबर रोजी अन्नधान्य वाहतुकीसाठी निविदा मागवल्या होत्या़ त्यानुसार ९ निविदा प्राप्त झाल्या़ त्यातील ६ निविदाधारक पात्र ठरले़ उर्वरित तिघेजण अपात्र ठरल्याचे सांगण्यात आले़ या तीनपैकी अपात्र ठरलेल्या प्रशांत अ‍ॅग्रोटेकच्या संचालकांनी न्यायालयात धाव घेऊन या निविदा प्रक्रियेत ‘जैसे थे’ चे आदेश मिळविले़ न्यायालयाने पुरवठा विभागाला आपले म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत़
त्यातच आता या निविदा प्रक्रियेत सर्वात कमी दर असलेल्या पारसेवार अ‍ॅण्ड कंपनीला या निविदा प्रक्रियेत प्रारंभी अपात्र ठरवले होते, अशी माहिती पुढे आली आहे़ निविदा प्रक्रियेत समाविष्ट असलेल्या एका कंत्राटदाराने हा आरोप केला आहेत़ पारसेवार अ‍ॅण्ड कंपनीने आर्थिक पत प्रमाणपत्र जोडले नव्हतेच त्यासह नियमावलीप्रमाणे कंपनी असल्यामुळे निविदा भरताना सर्व संचालकांकडून अधिकार पत्र घ्यावे लागते, त्यानुसार सदरील कंपनीने सर्व संचालकांकडून २०१७ मध्ये निविदा भरण्यासाठी अधिकार पत्र दिले नाही, नोंदणी प्रमाणपत्र नियमावली व पॅनकार्डमध्ये ताळमेळ जुळत नाही आदी आरोप करण्यात आले आहेत़ समितीनेही प्रारंभी आर्थिक पत दर्शवणारी बॅलेंस शीट नसल्याने प्रारंभी अपात्र ठरवले होते़ मात्र त्यांना पुन्हा कागदपत्रे सादर करण्याची संधी देण्यात आली आहे़ मात्र अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या सूचनेनुसार निविदा प्रक्रियेदरम्यान कोणालाही नंतर कागदपत्रे सादर करण्याची संधी देवू नये असेही स्पष्ट करण्यात आले आहे़ जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली १६ नोव्हेंबर रोजी निविदा प्रक्रियेतील सर्व कंत्राटदारांची बैठक झाली होती़ त्या बैठकीत सदर निर्णय झाला होता़ मात्र या बैठकीचा इतिवृत्तांत सहभागी कंत्राटदारांना दिला नाही़ विशेष म्हणजे, ही बैठक झाली की नाही याबाबतच पुरवठा विभागाने साशंकता निर्माण केली आहे़ या बैठकीला उपस्थित राहण्याचे पत्रही पुरवठा विभागाने कंत्राटदारांना दिले होते़
जवळपास ११ वर्षांपासून न्यायालयीन प्रकरणामुळे एकाच वाहतूक कंत्राटदाराकडे असलेली अन्नधान्य वाहतुकीसाठी पुरवठा विभागाने निविदा काढली खरी मात्र त्यानंतर झालेल्या या संपूर्ण आक्षेपांच्या मालिकेमुळे ही निविदा प्रक्रिया आता आणखीनच वादाच्या भोवºयात सापडली आहे़
दरम्यान, मागील ११ वर्षांपासून अन्नधान्य वाहतूक करणाºया शोभना ट्रान्सपोर्टने १ डिसेंबरपासून वाहतूक कंत्राट सोडण्याचे पत्र दिले होते़ मात्र या निविदा प्रक्रियेतील वादाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील स्वस्त धान्य लाभार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी पुरवठा विभागाचे अंतिम आदेश येईपर्यंत काम करण्याची तयारी दर्शविली आहे़

Web Title: In the negotiations of contract objections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.