नांदेड जिल्ह्यात आरटीई प्रवेशासाठी ३ हजार १८८ जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 07:17 PM2018-02-13T19:17:27+5:302018-02-13T19:19:53+5:30

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत विनाअनुदानित शाळा, कायम विनाअनुदानित शाळा व स्वयंअर्थ सहाय्यित शाळेत २५ टक्के आरटीई राखीव कोट्यातून प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया १० फेब्रुवारीपासून सुरू झाली असून जिल्ह्यातील २३४ शाळेत ३ हजार १८८ जागांसाठी प्रवेश देण्यात येणार आहे़ 

In Nanded district, 3 thousand 188 seats for the RTE admission | नांदेड जिल्ह्यात आरटीई प्रवेशासाठी ३ हजार १८८ जागा

नांदेड जिल्ह्यात आरटीई प्रवेशासाठी ३ हजार १८८ जागा

googlenewsNext

नांदेड : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत विनाअनुदानित शाळा, कायम विनाअनुदानित शाळा व स्वयंअर्थ सहाय्यित शाळेत २५ टक्के आरटीई राखीव कोट्यातून प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया १० फेब्रुवारीपासून सुरू झाली असून जिल्ह्यातील २३४ शाळेत ३ हजार १८८ जागांसाठी प्रवेश देण्यात येणार आहे़ 

सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीईअंतर्गत २५ टक्के आॅनलाईन प्रवेश अर्ज प्रक्रिया २८ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे़ आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील बालकांसाठी हा प्रवेश निश्चित केला आहे़ नांदेडसह जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत नामांकित शाळेमध्ये २५ टक्के  प्रवेश दिला जात असला तरी अनेक शाळांनी आपले उद्दिष्ट गतवर्षी पूर्ण केले नव्हते़ त्यामुळे एक  हजारांहून अधिक जागा प्रवेशाविना रिक्त होत्या़ यावर्षी आतापासूनच प्रवेशासाठी शिक्षण विभागाने नियोजन केले आहे़ यासंदर्भात संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची बैठकही घेण्यात आली होती़ आॅनलाईन प्रवेश अर्ज प्रक्रिया करण्यासंदर्भात पालकांनाही मार्गदर्शन करण्यात आले होते़ त्यानुसार यंदा १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत़ 

वेळेत अर्ज करा : शिक्षण विभागाचे आवाहन
अर्धापूर तालुक्यात १५ शाळांत २०५ जागा, भोकर - ५ शाळांत ६२, बिलोली -११ शाळांत २०१, देगलूर - १३ शाळांत १९७, धर्माबाद - ९ शाळांत ९४, हदगाव - ७ शाळांत ६३, हिमायतनगर -४ शाळांत ९९, कंधार - ८ शाळांत ९९, किनवट - १४ शाळांत ११२, लोहा - १७ शाळांत १२०, माहूर - ४ शाळांत ३५, मुदखेड - १२ शाळांत १८२, मुखेड - १० शाळांत ११५, नायगाव - १९ शाळांत ३१०, नांदेड तालुका - ४३ शाळांत ६११,नांदेड शहर - ३८ शाळांत ६३१ व उमरी तालुक्यात ५ शाळांत ५२ जागा प्रवेशित आहेत़ पालकांनी आॅनलाईन अर्ज मुदतीत करण्याचे आवाहन शिक्षणाधिकाºयांनी केले.

Web Title: In Nanded district, 3 thousand 188 seats for the RTE admission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.