किनवट पंचायत समितीचा कारभार वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 12:36 AM2019-01-18T00:36:24+5:302019-01-18T00:39:43+5:30

पंचायत समितीच्या ढिसाळ कारभाराने कळसच गाठला असून दाखल होणा-या तक्रार व निवेदनाची वेळीच चौकशी करण्यात येत नसल्याने कोणाचेही नियंत्रण राहिले नाही.

Kinwat Panchayat Samiti's control over the wind | किनवट पंचायत समितीचा कारभार वाऱ्यावर

किनवट पंचायत समितीचा कारभार वाऱ्यावर

Next
ठळक मुद्देनागरिकांची कामे खोळंबलीपूर्णवेळ बीडीओ नसल्याने समस्या वाढल्या

किनवट : पंचायत समितीच्या ढिसाळ कारभाराने कळसच गाठला असून दाखल होणा-या तक्रार व निवेदनाची वेळीच चौकशी करण्यात येत नसल्याने कोणाचेही नियंत्रण राहिले नाही. त्यातच गेल्या साडेसात-आठ महिन्यापासून प्रभारीराज असल्याने कोणाचा कोणाला पायपोस नाही़ हे विदारक चित्र आदिवासी भागातील पंचायत समितीचे आहे़
बोधडी (बु) येथील ग्रामपंचायत सदस्य गजानन मुंडे यांनी १८ डिसें २०१८ रोजी गटविकास अधिकारी यांचेकडे ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य यांचे मानधन भत्ता उचलून हडप केल्याची तक्रार केली होती़ त्यावर बीडीओनी २९ डिसें २०१८ रोजी विस्तार अधिकारी के़ व्ही़ रेनेवाड व शेख म़ लतीफ यांच्या नावे काढून चौकशी करून अहवाल सादर करावा़ याबाबत संबंधितास अवगत करावे असे लेखी पत्र देऊनही ते पत्र विस्तार अधिकारी यांच्या हातात पडले नाही़ परिणामी चौकशीचे काय झाले म्हणून नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष दिनकर दहिफळे यांनी पंचायत समिती गाठून सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता उपस्थित कर्मचारी बेजबाबदार उत्तरे देत दिशाभूल केल्याचा आरोप आहे. पंचायत समितीच्या कर्मचाºयांवर नियंत्रण नाही, शिस्त नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली़
२९ डिसें २०१८ रोजी गटविकास अधिकारी यांच्या स्वाक्षरीने निघालेले पत्र आवक जावक मध्येच ठेवल्याने व ते पत्र विस्तार अधिकारी यांनी न घेतल्याने नोटीस बजवून खुलासा मागितला जाणार आहे व त्यानंतर कार्यवाही केली जाईल, असे प्रभारी बीडीओ नारवटकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले़
दरम्यान, याच काळात चौकशीचे पत्र विस्तार अधिकारी लतीफ यांनी तब्बल सतरा दिवसांंनी स्वीकारले़ मात्र त्याचवेळी मी चौकशी करण्यास आदर पूर्वक नाकारत असल्याचे पत्र बीडीओना विस्तार अधिकारी शेख म़लतीफ यांनी देऊन चार कारणे स्पष्ट केली़ त्यात मुख्य कारण म्हणजे बोधडी हे गावं राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील असून स्थानिक कर्मचारी अधिकाºयांमार्फत केल्यास दोन्ही गटाकडून दबाव व मानसिक त्रास होण्याचा संभव असल्याचे स्पष्ट केले आहे़ त्यामुळे चौकाशीचा गुंता वाढला आहे असेच काहीसे चित्र आहे़ एकूणच सारा प्रकार पाहता पंचायत समितीचा ढिसाळ कारभार सुरू असल्याचे स्पष्ट होते़
कर्मचा-यांची गैरहजेरी

  • पंचायत समितीत होणा-या कोणत्याही महापुरूषांच्या जयंती, पुण्यतिथीला पं़ स़ चे कर्मचारी उपस्थित राहत नसल्याची खंत उपसभापती गजाजन कोल्हे पाटील यांनी व्यक्त केले़
  • किनवट या आदिवासी तालुक्यात १३४ ग्रामपंचायती असून त्यांचा कारभार पंचायत समिती मार्फत बघितल्या जातो़ श्रेणी एकचे गटविकास अधिकारी हे पद कार्यान्वित आहे़ मात्र मे महिन्यात बीडीओ दिलीप इंगोले यांची इतरत्र झाल्याने त्यानंतर सहायक बीडीओ बी़जी़सुनकावाड, गटशिक्षणाधिकारी सुभाष पवणे, माहूरचे बीडीओ मंदाडे व त्यांनतर हिमायतनगरचे सुहास कोरेगावे व आता उमरीचे सहायक बीडीओ पीक़े़ नारवटकर यांच्याकडे २८ डिसेंबरपासून प्रभारी पदभार आह़े किनवट या आदिवासी तालुक्यातील पंचायत समितीला पूर्णवेळ बीडीओ नसल्याने समस्याच समस्या निर्माण झाली आहे़
  • पंचायत क्षेत्र विस्तार कायदा (पेसा) अंतर्गत मोडणा-या पंचायत समितीकडे कोणाचेही लक्ष नाही़ परिणामी दाखल होणाºया तक्रारीची दखल घेतली जात नाही़ चौकशीसाठी देण्यात आलेले पत्र पंधरा-पंधरा दिवस संबंधितांना पोहचत नाही़ वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या घेऊन उपोषण करणा-या उपोषणकर्त्यांना लेखी आश्वासन देऊनही त्याची अंमलबजावणी केली जात नाही, नव्हे पूर्तता केली जात नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत़

Web Title: Kinwat Panchayat Samiti's control over the wind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.