बळेगाव पाणीपुरवठा योजनेत अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 12:40 AM2017-12-16T00:40:34+5:302017-12-16T00:40:50+5:30

तालुक्यातील बळेगाव येथील पाणीपुरवठा योजनेत १ कोटी ६ लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार अध्यक्ष व सचिवांविरुद्ध उमरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

Impact in Balegaon Water Supply Scheme | बळेगाव पाणीपुरवठा योजनेत अपहार

बळेगाव पाणीपुरवठा योजनेत अपहार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
उमरी: तालुक्यातील बळेगाव येथील पाणीपुरवठा योजनेत १ कोटी ६ लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार अध्यक्ष व सचिवांविरुद्ध उमरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बळेगाव येथील पाणीपुरवठा योजनेत सन २००६ ते २००९ या तीन वर्षांच्या कालावधीत आरोपींनी संगनमत करुन पाणीपुरवठा योजनेचे काम यशस्वी झाल्याचे कागदोपत्री दाखविले. योजनेचा खोटा अहवाल तयार करुन शासनाचे ३२ लाख २६० रुपये व ७४ लाख ४३३० रुपये असे एकूण १ कोटी ६ लाख ४ हजार ५९० रुपयांच्या निधीचा अपहार केला. संबंधितांनी याप्रकरणी जनतेचा विश्वासघात व फसवणूक केली, अशी तक्रार दत्तराव बापूजी गाढे (रा. बळेगाव) यांनी केली.
या तक्रारीवरुन उमरीचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशावरुन उमरी पोलिसांत उमरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती व पाणीपुरवठा समितीचे सचिव गणेश गाढे तसेच पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष धोंडिबा गाढे या दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक संदीपान शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शहदेव खेडकर हे तपास करीत आहेत. दरम्यान, या प्रकरणामुळे उमरी तालुक्यात खळबळ उडाली आहे़

Web Title: Impact in Balegaon Water Supply Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.