सुटीचा बेत आखताय़? सावधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 12:49 AM2019-05-06T00:49:23+5:302019-05-06T00:52:07+5:30

सध्या सुट्यांचा हंगाम असून अनेक कुटुंब घराला कुलूप लावून बाहेर फिरायला, लग्नसमारंभाला जातात़ हीच संधी साधत चोरटे त्यांच्या घरावर डल्ला मारतात़ लाखो रुपयांची संपत्ती असलेल्या घराला पाचशे ते हजार रुपयांचा लावलेला कडीकोंडा सहजपणे तोडून ऐवज लंपास करतात़ गेल्या काही दिवसांत अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे़

if you plannig for vacation? Be careful | सुटीचा बेत आखताय़? सावधान

सुटीचा बेत आखताय़? सावधान

Next
ठळक मुद्देपोलीस अधीक्षकांचे आवाहन चोरीच्या घटना टाळण्यासाठी खबरदारी घ्या

नांदेड : सध्या सुट्यांचा हंगाम असून अनेक कुटुंब घराला कुलूप लावून बाहेर फिरायला, लग्नसमारंभाला जातात़ हीच संधी साधत चोरटे त्यांच्या घरावर डल्ला मारतात़ लाखो रुपयांची संपत्ती असलेल्या घराला पाचशे ते हजार रुपयांचा लावलेला कडीकोंडा सहजपणे तोडून ऐवज लंपास करतात़ गेल्या काही दिवसांत अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे़ त्यामुळे घराला कुलूप लावून जाताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी केले आहे़
सध्या मुलांच्या शाळांना सुट्या असून लग्नसराईचा हंगामही सुरु आहे़ त्यामुळे अनेक कुटुंब बाहेरगावी जाण्याचा बेत आखतात़ परंतु बाहेर जाण्यासाठी आपल्या घराच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची गरज आहे़ बाहेरगावी जाण्यापूर्वी सर्व मौल्यवान वस्तू बँकेच्या लॉकरमध्ये ठेवाव्यात़ आपण बाहेरगावी जात असल्याबाबत विश्वासू शेजाऱ्यास कल्पना द्यावी़ शक्य असल्यास सीसीटीव्ही बसवून ते चालू स्थितीत राहतील याची दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे़
मुख्य दरवाजा तसेच खिडक्या व दरवाजे यांचे ग्रील मजबूत व बंद आहेत का? याची खात्री करावी़ शक्य असल्यास एखादी विश्वासू व ओळखीची व्यक्ती घरी हजर ठेवावी़ आपली दुचाकी ही ग्रीलच्या आत हँडललॉक करुन ठेवावी़ रात्री अंगणातील लाईट सुुरु ठेवावा़ शक्य असल्यास सिक्यूरिटी अलार्म सिस्टीम बसवून घ्यावी़ घरात जास्त रोख रक्कम, दागिने आदी मौल्यवान वस्तू ठेवू नये़ काही अनुचित आढळून आल्यास अथवा फेरीवाले, वारंवार एकाच कॉलनीत चकरा मारणारी व्यक्ती आढळून आल्यास तत्काळ नजीकच्या ठाण्यात पोलिसांशी संपर्क साधावा़ सदर माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक जाधव यांनी केले आहे़
संशयास्पद व्यक्तींची तात्काळ चौकशी करा
चोरटे चोरी करण्यापूर्वी एक दोन दिवस अगोदर अथवा दिवसभरात कॉलनी, अपार्टमेंटमध्ये येवून तेथील हालचालीची चाचपणी करीत असतात़ इतर साहित्य घेवून घरात तसेच अपार्टमेंटमध्ये येणा-या व्यक्तींवर व त्याच्या हालचालीवर संशय आल्यास चौकशी करावी़
तसेच अपार्टमेंटमध्ये येणाºया, जाणाºया अनोळखी व्यक्तींची वॉचमनमार्फत एका रजिस्टरवर नोंद ठेवणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे अपार्टमेंट, कॉलनीसाठी वॉचमेन ठेवताना त्याची चौकशी करूनच त्यास कामावर ठेवावे़

Web Title: if you plannig for vacation? Be careful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.