अहो आश्चर्यम् ! चोरीस गेलेला संगणक गुपचूप पुन्हा कार्यालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2018 01:01 AM2018-11-07T01:01:23+5:302018-11-07T01:02:54+5:30

‘लोकमत’ने वाचा फोडताच हळूहळू गुपचूप संगणक कार्यालयात आला़

Hey surprise! The stolen computer secretly in the office | अहो आश्चर्यम् ! चोरीस गेलेला संगणक गुपचूप पुन्हा कार्यालयात

अहो आश्चर्यम् ! चोरीस गेलेला संगणक गुपचूप पुन्हा कार्यालयात

googlenewsNext
ठळक मुद्दे‘लोकमत’चा दणकागटशिक्षणाधिकाऱ्यांनी नेमली चौकशी समिती

हदगाव : येथील बीईओ कार्यालयातील साहित्य चोरीला गेले की दुरुस्तीला गेले अथवा कर्मचा-यांच्या घरी गेले, या विषयाला ‘लोकमत’ने वाचा फोडताच हळूहळू गुपचूप संगणक कार्यालयात आला़ दोन बॅटरी डिस्चार्ज झाल्याने सांगण्यात आले़ परंतु, बातमीची दखल घेत बीईओ रुस्तुम ससाणे यांनी चौकशी नेमली आहे़ त्यामध्ये आता कार्यालयातील साहित्य नोंदी किती आहेत व बाहेर किती गेले याचा पर्दाफाश होणार आहे़
३१ आॅक्टोबरला कार्यालयातील साहित्य नसल्याचे अधिकाºयांना कळाले ; पण चोरी झाली म्हणावी तर तोडफोड नाही़ साहित्य दुरुस्तीला नेले म्हणावे तर तसे कोणी सांगितले नाही़ कर्मचाºयांनी घरी नेले तर संबंधितांना कल्पना देणे आवश्यक आहे़ परंतु, या कार्यालयात कोणाला कोणाचा थांगपत्ता नाही़ ‘लोकमत’ने या प्रकरणाला वाचा फोडली़ त्यामुळे शिक्षण विभाग खडबडून जागा झाला़ कर्मचारी, शिक्षण विस्तार अधिकारी, बीईओ यांची घमासान चर्चा झाली़ वार्ताहरांना माहिती दिली़ यावर चर्चाही झडली़ प्रकरण गंभीर असल्याचे लक्षात आल्याने बीईओ रुस्तुमराव ससाणे यांनी चौकशी लावली़
ग्रामीण भागातही शाळेसाठी मिळणारे बरेच चांगले साहित्य शिक्षकांच्या घरीच बघायला मिळते़ खेड्यातील विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान मिळावे यासाठी शाळांना संगणक देण्यात आले होते़ परंतु शाळेत वीज नाही, तज्ज्ञ शिक्षक नाही म्हणून हे साहित्य शिक्षकांच्या घरी त्यांची मुले वापरतात़ तर कुठे शाळेतच धूळखात पडून ते निकामी झाले़ याविषयी शिक्षक कारणे सांगतात़ शाळेला दरवाजे, खिडक्या बरोबर नाहीत़ चोरीला गेले तर कोण जबाबदार म्हणून चोरी जावू नये म्हणून तेच चोरी करतात़

  • अद्यापही पोलीस ठाण्याला चोरीची तक्रार देण्यात आली नाही, हे विशेष! कारण पोलिसांकडे तक्रार गेल्यास अनेक गुपिते उघड होतील अशी भीती तर या विभागाला वाटत नाही़ एका शिक्षण विस्तार अधिका-याने हा डाव असू शकतो असा अंदाज व्यक्त केला़ साहित्य आपण न्यायचे, प्रमुखाला जबाबदार धरायचे, त्यांच्या जागी प्रभारी म्हणून काम पाहण्याचे डोहाळे अनेकांना लागल्याचे त्यांनी सांगितले़
  • सोमवारी गुपचूप कार्यालयात संगणक आला़ तो कोणी नेला होता? व कोणी आणला? कोणालाच खबर नाही़ तर काही साहित्य दुरुस्तीला टाकले असेही या चर्चेत सांगण्यात आले़ रजिस्टर क्रमांक ३२ ला या कार्यालयास प्राप्त साहित्याची नोंद असते़ प्राप्त साहित्य व उपलब्ध साहित्य याचीही आता चौकशी होणार आहे़ त्यामुळे कार्यालयातील आतापर्यंतचे किती साहित्य कर्मचारी, अधिकारी यांचे घरी गेले यातूनच स्पष्ट होईल़
  • अद्यापही पोलीस ठाण्याला चोरीची तक्रार देण्यात आली नाही हे विशेष़ कारण, पोलिसांकडे तक्रार गेल्यास अनेक गुपिते उघडे होतील अशी भीती तर या विभागाला वाटत नाही !

Web Title: Hey surprise! The stolen computer secretly in the office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.