नांदेड जिल्ह्यात वाळू उपशाविरोधात मोहीम तीव्र करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 12:22 AM2018-04-04T00:22:32+5:302018-04-04T00:22:32+5:30

जिल्ह्यात रात्रंदिन होत असलेल्या अवैध वाळू उपशामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. अनेक ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न उद्भवत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैध वाळू उपशाविरुद्धची मोहीम अधिक तीव्र केली जाईल, असे सहायक पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी स्पष्ट केले.

The campaign against sand rains in Nanded district will be intensified | नांदेड जिल्ह्यात वाळू उपशाविरोधात मोहीम तीव्र करणार

नांदेड जिल्ह्यात वाळू उपशाविरोधात मोहीम तीव्र करणार

googlenewsNext
ठळक मुद्देनुरुल हसन यांचा इशारा : वाळू ठेकेदारांनी कारवाईच्या विरोधात घेतली जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : जिल्ह्यात रात्रंदिन होत असलेल्या अवैध वाळू उपशामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. अनेक ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न उद्भवत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैध वाळू उपशाविरुद्धची मोहीम अधिक तीव्र केली जाईल, असे सहायक पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात अवैध वाळू उपसा करणा-यांविरुद्ध पोलिसांनी मोहीम उघडली आहे. २९ मार्चच्या रात्री उमरी तालुक्यातील कौडगाव, बिजेगाव वाळू घाटावर मोठी कारवाई करत ४० वाहने जप्त केली. त्यामध्ये ९ पोकलेन, टिप्पर, हायवा ट्रकचा समावेश होता.
त्यानंतर २ एप्रिल रोजी सातेगाव येथेही कारवाई करत मोठा वाळूसाठा जप्त केला. सदर कारवाईचे अधिकार पोलिसांना नसल्याचा आरोप केला जात आहे. त्याबाबत बोलताना नुरुल हसन म्हणाले, ज्या ज्या गोष्टी बेकायदेशीर आहेत त्याविरुद्ध कारवाई करणे हे पोलिसांचे काम आहे. पोलीस जिल्ह्यातच नव्हे, तर जिल्ह्याबाहेर जावून आपले काम करु शकतात. आतापर्यंत पोलीस विभाग काही बाबी नजरअंदाज करीत असत. आगामी काळात मात्र आता जिल्ह्यात बेकायदेशीररित्या एकाही ठिकाणाहून वाळू उपसा होणार नसल्याचा इशारा देताना अवैध वाळू उपशाविरुद्ध मोहीम आणखी तीव्र केली जाणार असल्याचे हसन यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, जिल्ह्यात पोलिसांकडून कायदेशीर वाळू ठेकेदारांवर बेकायदेशीर कारवाई केली जात असल्याचा आरोप वाळू ठेकेदारांनी केला असून ही कारवाई करणाºया अधिकाºयांना निलंबित करण्याची मागणीही ठेकेदारांनी मंगळवारी जिल्हाधिकाºयांकडे केली. यापुढेही कारवाईचे असे प्रकार सुरूच राहिल्यास रेती ठेकेदार आपले परवाने महसूल विभागाला परत करतील, असा इशाराही देण्यात आला आहे. पोलिसांनी जप्त केलेले सर्व वाहने परत द्यावीत, आगामी काळात वाळू ठेकेदारावर कोणतीही कारवाई होणार नाही, याची दक्षता घ्यावी. जे ठेकेदार रॉयल्टीधारक आहेत त्यांना न्याय द्यावा आदी मागण्या जिल्ह्यातील वाळू ठेकेदारांनी जिल्हाधिकाºयांची भेट घेवून केल्या आहेत.
यावेळी वाळू ठेकेदार दिगंबर करडीले, रामसिंग चव्हाण, सुनील काळे, शेख रसूल, परमेश्वर पवार, मुश्ताक अली, रुपेश कुंटूरकर, बालाजी पुयड, दत्ता पाटील कदम आदींचा समावेश होता.

‘ते’ जेसीबी रस्ता बनविण्यासाठी असल्याचा दावा
पोलिसांनी बिजेगाव, सातेगाव या वाळूघाटावर कारवाई करत जेसीबी जप्त केल्या आहेत. या जेसीबी मशीनद्वारे वाळू उपसा होत नव्हता तर रस्ता बनविण्यासाठी त्यांचा उपयोग केला जात होता.पोलिसांनी विनाकारण जप्त केल्याचा दावाही वाळू ठेकेदाराने जिल्हाधिकाºयांकडे केला आहे.

Web Title: The campaign against sand rains in Nanded district will be intensified

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.