खुनातील फरार आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 12:56 AM2018-12-23T00:56:12+5:302018-12-23T00:56:35+5:30

हस्सापूर शिवारात खून करुन प्रेत गोदावरीच्या पात्रात फेकणाऱ्या दोनपैकी एका आरोपीला पकडण्यात इतवारा पोलिसांना यश आले आहे़ या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता़ हा आरोपी मरघाट परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना खब-याकडून मिळाली होती़

Arrested in absconding accused | खुनातील फरार आरोपी जेरबंद

खुनातील फरार आरोपी जेरबंद

Next

नांदेड : हस्सापूर शिवारात खून करुन प्रेत गोदावरीच्या पात्रात फेकणाऱ्या दोनपैकी एका आरोपीला पकडण्यात इतवारा पोलिसांना यश आले आहे़ या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता़ हा आरोपी मरघाट परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना खब-याकडून मिळाली होती़
१३ नोव्हेंबर रोजी हरमिंदरसिंघ भोसीवाले या युवकाचा गोदावरी नदीपात्रात मृतदेह आढळून आला होता़ या प्रकरणात ग्रामीण पोलिसांनी बालाजी भंगारेला पकडले होते़ तर किरण माने आणि आतिष जाधव हे दोघे जण फरारच होते़ शुक्रवारी रात्री हे दोन्ही आरोपी नांदेडात असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली होती़ त्यानंतर ग्रामीण पोलिसांच्या पथकाने त्यांचा पाठलागही केला़ परंतु, ते सापडले नाहीत़ त्यानंतर इतवारा पोलीस ठाण्याचे उपविभागीय अधिकारी धनंजय पाटील, पोनि़ साहेबराव नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि नंदकिशोर साळुंके, पोउपनि सूर्यवंशी, पोहेकॉ़ बाबर, जी़ एच़ जाधव, विक्रम वाकडे, कालरा, नागरगोजे यांनी मरघाट शिवारातून किरण माने याच्या मुसक्या आवळल्या़ तर यावेळी आशिष जाधव पळून जाण्यात यशस्वी झाला़ शस्त्र बाळगल्याप्रकरणी किरण माने याच्याविरोधात इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ खुनातील फरार असलेल्या या दोन्ही आरोपींना पकडण्यासाठी नांदेड ग्रामीण आणि इतवारा पोलिसांमध्ये चढाओढ लागली होती़ त्यात इतवारा पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळत सरशी मिळविली़
चोरट्याकडून बारा मोबाईल जप्त
इतवारा भागात मोबाईल लंपास करणा-या एका चोरट्याला पोलिसांनी पकडले असून त्याच्याकडून ४४ हजार रुपये किमतीचे १२ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत़ शहरात मोबाईल चोरीच्या घटना दररोज घडत आहेत़ परंतु, मोबाईलचोरटे मात्र पोलिसांच्या हाती लागत नव्हते़ इतवाराच्या गुन्हे शोध पथकाचे पोउपनि नंदकिशोर सोळुंके यांनी संशयित आरोपी गौसखान नईम खान (रा़हिलालनगर) याला अटक करुन न्यायालयात हजर केले होते़ न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली होती़ पोलीस कोठडीत आरोपीने चोरीची कबुली दिली असून त्याच्याजवळील ४४ हजार रुपये किमतीचे मोबाईल जप्त केले़

Web Title: Arrested in absconding accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.