नांदेडमध्ये कचरा विल्हेवाटीसाठी आता दंडाची मात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 01:02 AM2018-06-30T01:02:57+5:302018-06-30T01:06:33+5:30

नागरिकांकडून या घंटागाडीत कचरा न टाकता तो उघड्यावर टाकण्यात येतो़ त्याचबरोबर ओला आणि सुका कचराही वेगवेगळा करण्यात येत नाही़ अशा मालमत्ताधारकांना आता दंड आकारण्यात येणार आहे़ प्रथम ५० रुपये व त्यानंतर प्रत्येक वेळी दंडाची रक्कम ५०० रुपये एवढी राहणार आहे़

Amount of penalty for disposal of waste in Nanded | नांदेडमध्ये कचरा विल्हेवाटीसाठी आता दंडाची मात्रा

नांदेडमध्ये कचरा विल्हेवाटीसाठी आता दंडाची मात्रा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड :शहर स्वच्छतेसाठी मनपाकडून अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत़ घरोघर घंटागाडी जाण्याची व्यवस्थाही करण्यात आली़ त्यामध्ये ओला आणि सुका कचरा वेगवेगळा गोळा करण्यात येतो़ परंतु, नागरिकांकडून या घंटागाडीत कचरा न टाकता तो उघड्यावर टाकण्यात येतो़ त्याचबरोबर ओला आणि सुका कचराही वेगवेगळा करण्यात येत नाही़ अशा मालमत्ताधारकांना आता दंड आकारण्यात येणार आहे़ प्रथम ५० रुपये व त्यानंतर प्रत्येक वेळी दंडाची रक्कम ५०० रुपये एवढी राहणार आहे़
शहर स्वच्छतेचा प्रश्न अनेक महिने प्रलंबित होता़ एटूझेडचे काम बंद केल्यानंतर नवीन निविदा प्रक्रिया अनेक वादात अडकली होती़ हा वाद न्यायालयातही गेला होता़ त्यामुळे शहर स्वच्छतेचा प्रश्न बिकट बनला होता़ आता नवीन कंत्राटदाराकडे हे काम सोपविण्यात आले असून शहर स्वच्छतेचा गाडाही रुळावर आला आहे़ परंतु, त्यामध्येही कंत्राटदाराकडून कचऱ्याचे वजन वाढविण्यासाठी अनेक हातखंडे वापरण्यात येत असल्याचे पुढे आले आहे़ त्यात आता महापालिकेने घरात ओला व सुका कचरा ठेवण्यासाठी दोन वेगवेगळ्या कुंड्या न ठेवल्यास दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे़ त्यात पहिल्या वेळी ५० तर त्यानंतर प्रत्येक वेळी ५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे़
फेरीवाले, भाजीपाला, फळविक्रेते व दुकानदारांनी स्वत: कचºयाची पेटी न ठेवल्यास त्यांच्यावरही अशाचप्रकारे दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे़ त्याचबरोबर रस्ते, महामार्गावर घाण करणाºयास दीडशे रुपये, सार्वजनिक ठिकाणी पिचकाºया मारणाºयास शंभर रुपये, उघड्यावर लघूशंका, शौच करणाºयास शंभर रुपये दंड आकारण्यात येणार आहे़
---
महापालिकेने कचरा कंत्राटदाराला वजनाप्रमाणे कचरा उचलण्याचे कंत्राट दिले आहे़ कंत्राटदाराकडून ओला व सुका कचरा गोळा करताना वजन वाढविण्यासाठी शक्कल लढविण्यात येत आहे़ कचºयाच्या गाडीत दगड, विटा आणि माती भरण्यात येत आहे़ यापूर्वीही हा प्रकार उघडकीस आला होता़ परंतु, त्यावर मनपाने कोणतीही कारवाई केली नाही़ मराठा महासंग्रामने या सर्व प्रकाराचे चित्रण केले आहे़

Web Title: Amount of penalty for disposal of waste in Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.