नायगावच्या कृषी विभागाने सोयाबीनच्या बनावट बियाण्यांची पकडली गाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2023 07:35 PM2023-06-13T19:35:06+5:302023-06-13T19:35:14+5:30

एकूण ९९ लाखांचा माल जप्त करून सदर गाडी नायगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आल्याची  माहिती तालुका कृषी अधिकारी वरपडे यांनी दिली आहे.

Agriculture department of Naigaon seized a train of fake soybean seeds | नायगावच्या कृषी विभागाने सोयाबीनच्या बनावट बियाण्यांची पकडली गाडी

नायगावच्या कृषी विभागाने सोयाबीनच्या बनावट बियाण्यांची पकडली गाडी

googlenewsNext

नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथे तालुका कृषी अधिकार्‍यांच्या नेतृत्वाखाली गोपनीय मिळालेल्या माहितीनुसार नायगाव तालुक्यातील कोलंबी येथे बनावट सोयाबीन विक्रीसाठी घेऊन जाणार एम.पी.- ४८ एच. ३५७५ ट्रक पकडला असून, गाडी मध्ये ६९० बॅगा सिल होत्या. यामध्ये एकूण ९९ लाखांचा माल जप्त करून सदर गाडी नायगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आल्याची  माहिती तालुका कृषी अधिकारी वरपडे यांनी दिली आहे. गोदावरी सीड्स कंपनीच्या मालकाने बनावट बियाणे अनेक वेळा विक्री झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. सदरील प्रकरणी तपास नायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गुट्टे करित आहेत. 

Web Title: Agriculture department of Naigaon seized a train of fake soybean seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nandedनांदेड