नांदेड जिल्ह्यात शौचालय बांधकामाचे ११८ कोटी अनुदान वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 12:28 AM2018-04-15T00:28:04+5:302018-04-15T00:32:25+5:30

नांदेड : ‘स्वच्छ भारत मिशन’ अभियानांतर्गत जिल्ह्यातील जवळपास ९८ हजार लाभार्थ्यांना वर्ष २०१७- २०१८ मध्ये शौचालय बांधकामासाठी लाभार्थ्यांना ११८ कोटी रूपये अनुदान वाटप केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर ९० हजार लाभार्थ्यांना अजूनही अनुदानाची प्रतीक्षा करावी लागत आहे.

118 crore grant for construction of toilets in Nanded district | नांदेड जिल्ह्यात शौचालय बांधकामाचे ११८ कोटी अनुदान वाटप

नांदेड जिल्ह्यात शौचालय बांधकामाचे ११८ कोटी अनुदान वाटप

Next
ठळक मुद्दे‘स्वच्छ भारत मिशन’ : आणखी ११२ कोटींची आवश्यकता

गोविंद सरदेशपांडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : ‘स्वच्छ भारत मिशन’ अभियानांतर्गत जिल्ह्यातील जवळपास ९८ हजार लाभार्थ्यांना वर्ष २०१७- २०१८ मध्ये शौचालय बांधकामासाठी लाभार्थ्यांना ११८ कोटी रूपये अनुदान वाटप केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर ९० हजार लाभार्थ्यांना अजूनही अनुदानाची प्रतीक्षा करावी लागत आहे.
‘स्वच्छ भारत मिशन’ अभियानांतर्गत लाभार्थ्यांना वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी शासनाच्या वतीने १२ हजार रूपयांचे अनुदान दिले जाते. दरम्यान, जिल्ह्यात वर्ष २०१७-२०१८ मध्ये आतापर्यंत जवळपास ९८ लाभार्थ्यांना ११८ कोटी १ लाख १६ हजार रूपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे.
यामध्ये अर्धापूर तालुक्यासाठी २४ लाख ८४ हजार, भोकर - ३ कोटी ५ लाख २८ हजार, बिलोली तालुक्यासाठी ४ कोटी ३० लाख ८ हजार रूपये, देगलूर तालुका- ८ कोटी ६० लाख २८ हजार, हदगाव तालुका - १५ कोटी २० लाख ४० हजार, हिमायतनगर - ७ कोटी ८५ लाख २८ हजार रूपये, कंधार तालुका - १४ कोटी २५ लाख ४८ हजार, किनवट - १६ कोटी ४५ लाख ४४ हजार रूपये तसेच लोहा तालुक्यात १० कोटी ६० लाख ४४ हजार रूपये अनुदान वाटप करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे माहूर तालुक्यात ७ कोटी ३२ हजार रूपये, मुखेड - ११ कोटी ४० लाख, नायगाव तालुका - ६ कोटी ६० लाख २४ हजार, उमरी - ६ कोटी ७ लाख ३२ हजार तर नांदेड तालुक्यातील लाभार्थ्यांना ६ कोटी ७५ लाख ३६ हजार रूपये असे एकूण जिल्ह्यात ११८ कोटी १ लाख १६ हजार रूपयांचे शौचालय बांधकामासाठीचे अनुदान वाटप करण्यात आले आहे.
दरम्यान, पायाभूत सर्व्हेक्षणात जिल्हा नुकताच पाणंदमुक्त झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर मुंबई येथे आयोजित एका कार्यक्रमात पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते जि.प. च्या अधिकाऱ्यांसह कर्मचाºयांचा नुकताच सत्कार करण्यात आला होता.
तालुकानिहाय पूर्ण झालेले शौचालय बांधकाम
अर्धापूर तालुका- ११ हजार ८१३, भोकर - १८ हजार ३२२, बिलोली - २३ हजार ५५७, देगलूर - २८ हजार ५८६, धर्माबाद - ११ हजार ५८२, हदगाव तालुका- ४२ हजार ८४३, हिमायतनगर - १७ हजार ५२७, कंधार - ३९ हजार ८६८, किनवट तालुका - ४१ हजार ४३, लोहा - ३६ हजार ६२३, माहूर तालुका - १६ हजार १९२, मुदखेड - १४ हजार ९७०, मुखेड - ३७ हजार ४४८, नायगाव तालुका - ३१ हजार ५३९, नांदेड - २२ हजार १८१ तर उमरी तालुक्यात १५ हजार ९०५ वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

आणखी ११२ कोटी निधीची आवश्यकता
दरम्यान, जिल्ह्यातील जवळपास ९० हजार वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांना अजूनही अनुदान प्राप्त झाले नाही. त्यासाठी आणखी अंदाजे ११२ कोटी रूपयांच्या निधीची आवश्यकता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Web Title: 118 crore grant for construction of toilets in Nanded district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.