जाणून घेऊया, कोणते खाद्यतेल आरोग्यासाठी चांगले?

By सुमेध वाघमार | Published: March 19, 2023 08:00 AM2023-03-19T08:00:00+5:302023-03-19T08:00:02+5:30

Nagpur News हृदयरोग व आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार तेलाचे प्रमाण जेवढे कमी राहील तेवढे आरोग्यासाठी चांगले.

Which edible oils are good for health? | जाणून घेऊया, कोणते खाद्यतेल आरोग्यासाठी चांगले?

जाणून घेऊया, कोणते खाद्यतेल आरोग्यासाठी चांगले?

googlenewsNext

नागपूर : आहारामध्ये फळे, भाज्या, कडधान्यासह तेलही महत्त्वाचे ठरते. जसे मीठ आहारात न टाळता येण्यासारखे, तसेच खाद्यतेल आहे. यामुळे आरोग्यासाठी कोणते तेल दररोज आहारात खायला हवे, हा प्रश्न सर्वांनाच पडतो. हृदयरोग व आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार तेलाचे प्रमाण जेवढे कमी राहील तेवढे आरोग्यासाठी चांगले.

- कोणत्या तेलातून काय मिळते?

 ऑलिव्ह ऑईल वापरा

आरोग्यतज्ज्ञांच्या मते, ऑलिव्ह ऑईलमध्ये मोठ्या प्रमाणात ‘मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड’ आणि ‘पॉलिअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड’ असतात जे हृदय निरोगी ठेवतात. या तेलाचा स्मोक पॉइंट कमी असतो.

 शेंगदाणा तेल

शेंगदाणा तेलमध्ये ‘व्हिटॅमिन ई’ आणि ‘मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स’ आणि ‘पॉलिअनसॅच्युरेटेड फॅट्स’ असतात. यामुळे हे तेल खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करू शकते.

 सूर्यफूल तेल

सूर्यफूल तेलामध्ये ‘व्हिटॅमिन ई’ असते. हृदयाच्या आरोग्यासाठी ते फारदेशीर ठरते.

सोयाबीन तेल

सोयाबीन तेलामध्ये भरपूर फॅटी ॲसिड असते ज्यामुळे संपूर्ण शरीराला फायदा होतो. सोयाबीन तेलामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल जमा होण्यापासून रोखता येते.

मोहरीचे तेल

मोहरीचा तेलामध्ये ‘मोनोअनसॅच्युरेटेड’ आणि ‘पॉलिअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड’ आणि ‘ओमेगा-३’ आणि ‘ओमेगा-६ फॅटी ॲसिड्स’ असते. मोहरीचे

:: करडई तेल : करडईचे दोन प्रकार आहेत, ज्यापासून करडई तेल बनते. एका प्रकारचे तेलात ‘मोनोसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स हे जास्त प्रमाणात असते, तर दुसऱ्या प्रकारात ‘पॉलिअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड’ असते. सध्या बाजारात पहिल्या प्रकारातील खाद्यतेल असते.

- आहारात तेलाचे प्रमाण कमी ठेवा 

जर तुम्ही आधीच हृदयविकाराने त्रस्त असाल तर तुम्हाला आहाराविषयी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. हृदयाच्या आरोग्यासाठी तेलाचे प्रमाण नेहमी कमी ठेवावे. ज्या तेलामध्ये ‘मोनोअनसॅच्युरेटेड फॅट’, ‘ओमेगा थ्री’ आणि ‘कॅरोटिन’ असते ते तेल स्वयंपाकासाठी निवडावे.

- डॉ. अमेय बीडकर, हृदयरोगतज्ज्ञ

एका व्यक्तीला ५०० ते ७५० मिलीलीटर  तेल पुरेसे 

प्रत्येक तेलात वेगवेगळे गुण असतात. यामुळे एकाच तेलाचा वापर करू नये. सकाळी एका तेलाचा वापर, तर सायंकाळी दुसऱ्या तेलाचा वापर करावा किंवा तेलाचे एक पाकीट संपल्यावर दुसऱ्या तेलाचे पाकीट वापरावे. एका महिना प्रतिव्यक्ती ५०० ते ७५० मिलीलीटर तेल पुरेसे आहे. ‘ट्रान्सफॅट’ तेल टाळल्यास उत्तम.

- कविता गुप्ता, आहारतज्ज्ञ

Web Title: Which edible oils are good for health?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.