‘ओजस’ प्रकल्पातील शाळांना कधी मिळणार बुस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 12:54 AM2018-09-15T00:54:37+5:302018-09-15T00:55:44+5:30

राज्यात आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाच्या १०० शाळा निर्माण करण्यासाठी शासनाने निर्णय घेतला. तेजस आणि ओजस या प्रकल्पात शाळांची निवड करण्यात आली. तेजसमध्ये नागपूर विभागातील २ शाळा तर ओसजमध्ये विभागातील १८ शाळांची निवड करण्यात येणार होती. ओजसमध्ये १८ पैकी १३ शाळांची निवड झाली. यात नागपूर जि.प.च्या दोन शाळांचा समावेश होता. परंतु शाळांची निवड झाल्यानंतर वर्षभरापासून शिक्षण विभागाकडून त्यावर काहीच संस्कार झाले नाही. त्यामुळे हा प्रकल्प आता गुंडाळल्यागत आहे.

When will the school of 'Ojas' project get its boost? | ‘ओजस’ प्रकल्पातील शाळांना कधी मिळणार बुस्ट

‘ओजस’ प्रकल्पातील शाळांना कधी मिळणार बुस्ट

Next
ठळक मुद्देनिवड होऊन लोटला १० महिन्यांचा कालावधी : नागपूर विभागात १३ शाळांची निवड

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यात आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाच्या १०० शाळा निर्माण करण्यासाठी शासनाने निर्णय घेतला. तेजस आणि ओजस या प्रकल्पात शाळांची निवड करण्यात आली. तेजसमध्ये नागपूर विभागातील २ शाळा तर ओसजमध्ये विभागातील १८ शाळांची निवड करण्यात येणार होती. ओजसमध्ये १८ पैकी १३ शाळांची निवड झाली. यात नागपूर जि.प.च्या दोन शाळांचा समावेश होता. परंतु शाळांची निवड झाल्यानंतर वर्षभरापासून शिक्षण विभागाकडून त्यावर काहीच संस्कार झाले नाही. त्यामुळे हा प्रकल्प आता गुंडाळल्यागत आहे.
कापोर्रेट शाळांप्रमाणे जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा सुधारावा यासाठी शासनाने ३० नोव्हेंबर २०१७ ला शासन निर्णय काढून राज्यातील सहा विभागात शंभर शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या निर्माण करण्याचा निर्णय घेतला होता. यात तेजस प्रकल्पासाठी विभागातून २ शाळा व ओजस प्रकल्पासाठी विभागातून १८ शाळा निवडायच्या होत्या. तेजससाठी नागपूर विभागातून चंद्रपूर व गोंदिया जि.प.च्या शाळांची निवड करण्यात येणार आहे. पण या शाळा निश्चित झाल्या नाही. तर ओजससाठी विभागातून १८ पैकी केवळ १३ शाळा निवडण्यात आल्या. यामध्ये नागपूर जि.प.च्या काटोल कल्याण शाळा व हिंगणा तालुक्यातील नीलडोह उच्च प्राथमिक शाळेचा समावेश आहे. सहा विभागात १० तेजस शाळांची निर्मिती मार्गदर्शक म्हणून तर त्या शाळा ओजस निवडप्राप्त ९० शाळांना धडे देणार होत्या़ प्रस्ताव सादर झाल्यानंतर तत्काळ मुख्याध्यापक, शिक्षकांचे प्रशिक्षण पुणे यशदा येथे घेण्यात आले़ महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाकडे या सर्व प्रकल्पाचे नियंत्रण होते़ पायाभूत सुविधा, डिजिटलायझेशन, इमारतीपासून ते वाहत्ुाकीपर्यंत सर्व सुविधा या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळणार होत्या़ वर्षभराच्या काळातच या प्रकल्पावर काहीच अभिप्राय शासनाचा नसल्याने प्रकल्प जमा झाल्यागत आहे़ याबाबत नागपूर शिक्षण विभागाने स्मरणपत्र पाठवून प्रकल्पाविषयीचे पुढील निर्देश मागितले होते़ परंतु, या पत्रावर काहीही उत्तर आले नाही. शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी हा प्रकल्प राबविला होता. त्यांची राजशिष्टाचार खात्यात बदली झाल्याने त्यांच्या जागी वित्त विभागातून वंदना कृष्णा या रुजू झाल्यात़ त्यामुळे हा प्रकल्प अडगळीत सापडल्याची माहिती आहे़

तेजसची निवड अजूनही नाही
शासन निर्णयानुसार तेजस आणि ओजस प्रकल्पासाठी शाळांची निवड नोव्हेंबर ते डिसेंबर २०१७ दरम्यान करायची होती. शाळा व शिक्षक निवड जानेवारी २०१८ पर्यंत करायची होती. फेब्रुवारी २०१८ पासून प्रत्यक्षात प्रकल्प सुरू होणार होता. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ओजससाठी विभागातून १३ शाळांची निवड झाली. शिक्षकांचे प्रशिक्षणही झाले. मुळात तेजस प्रकल्पात निवडलेल्या शाळा या ओजस प्रकल्पातील शाळांना सहकार्य व मार्गदर्शन करणार होत्या. परंतु तेजससाठी शाळांची निश्चिती झाली पण निवड अजूनही झाली नाही.

 

Web Title: When will the school of 'Ojas' project get its boost?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.