जीवनात यशस्वी होण्यासाठी हवी जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 01:07 AM2018-04-01T01:07:31+5:302018-04-01T01:07:45+5:30

प्रत्येकाने स्वप्न पाहावे आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी कठोर परिश्रम करावे. जगात अनेक आव्हाने आहेत. पण सृजनशील संकल्पना आणि यश प्राप्त करण्याची इच्छा असेल तर भाषा अडथळा होऊ शकत नाही. जीवनात स्वप्नाचा पाठपुरावा केल्यास यश हमखास मिळते. पण त्यासाठी मनात जिद्द, परिश्रम करण्याची तयारी आणि आत्मविश्वासाची जोड हवी, असा विश्वास भारतातील यशस्वी युवकांनी येथे व्यक्त केला.

Want to be successful in life, perseverance, self-confidence | जीवनात यशस्वी होण्यासाठी हवी जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास 

जीवनात यशस्वी होण्यासाठी हवी जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास 

googlenewsNext
ठळक मुद्दे युवकांचे प्रेरणा देणारे कथन : ‘यूथ’ संस्थेचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रत्येकाने स्वप्न पाहावे आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी कठोर परिश्रम करावे. जगात अनेक आव्हाने आहेत. पण सृजनशील संकल्पना आणि यश प्राप्त करण्याची इच्छा असेल तर भाषा अडथळा होऊ शकत नाही. जीवनात स्वप्नाचा पाठपुरावा केल्यास यश हमखास मिळते. पण त्यासाठी मनात जिद्द, परिश्रम करण्याची तयारी आणि आत्मविश्वासाची जोड हवी, असा विश्वास भारतातील यशस्वी युवकांनी येथे व्यक्त केला.
‘यूथ’ संस्थेच्या वतीने ‘यूथ टॉक’ या युवकांच्या यशस्वी जीवनाचे कथन करणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन आयटी पार्क, दक्षिण अंबाझरी मार्गावरील पर्सिस्टंट सिस्टीम आॅडिटोरियमध्ये शनिवारी करण्यात आले. या वेळी ‘यूथ’ संस्थेच्या संस्थापिका व सीईओ, पर्सिस्टंट सिस्टीम्सचे सीईओ समीर बेंदे, नागपूर एन्जल्सचे सहसंस्थापक शशिकांत चौधरी, इंडिया नेटवर्कच्या पल्लवी राव नार्वेकर, वन्यजीव अभ्यासक डॉ. जेरिल बानाईत, प्रहारच्या ट्रस्टी फ्लाईट लेफ्टनंट शिवाली देशपांडे, रिनोव्हेटिओ एनजीओचे संस्थापक नकुल अग्रवाल, उद्योजिका व वक्त्या स्वयमा अहमद, लेखक सिद्धार्थ रॉय, अभिनेत्री मेहेर वालिया, आरजे दिव्या, गायक श्रेया जैन आणि को-क्रिएटोचे विवर्ट व साकेत यांनी यशस्वी जीवनाचे सार सांगितले.
केतकी मेहता म्हणाल्या, युवकांमध्ये प्रतिभा आहे. एका सहायकाला सोबतीला घेऊन आर्मी आॅफिसरवर फिल्म तयार केली. या फिल्मला एकाच दिवसात २ लाख दर्शक मिळाले. कोणत्याही कामात भाषा अडथळा होऊ शकत नाही. समीर बेंद्रे म्हणाले, युवकांसमोर अनेक आव्हाने आहेत. रेल्वेच्या एक लाख जागेसाठी एका आॅस्ट्रेलियाच्या लोकसंख्याएवढे अर्ज येतात. युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी वसिम अक्रम आणि इम्रानखान यांची उदाहरणे दिली. यशात नेतृत्वगुण महत्त्वाचा आहे.
डॉ. जेरिल बानाईत यांनी वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी केलेल्या संघर्षाची माहिती दिली. लोकांचा जंगलात वावर वाढल्यामुळे वाघांचे हल्ले वाढले आहेत. वन विभागाचा वाघिणीला मारण्याचा आदेश आणि वाघिण वाचविण्यासाठी एकट्याने केलेल्या न्यायालयीन संघर्षाची माहिती दिली. १९ वर्षीय लेखक सिद्धार्थ रॉय याने लेखक बनण्याचा प्रवास कथन केला. आई सुपरवूमन असल्याचे तो म्हणाला. अकरावीत असताना ५०० शब्दांची कथा लिहिली. वडिलांनी पुढाकार घेऊन ‘शॉर्ट स्टोरी’चे पुस्तक बारावीत असताना प्रकाशित केले. त्यानंतर लोक मला ओळखू लागले. जीवनात आनंद मिळेल तेच काम करा, असा संदेश त्यांनी युवकांना दिला. बॅटमिंटनमध्ये रौप्य पदक मिळविल्याचे त्याने सांगितले.

Web Title: Want to be successful in life, perseverance, self-confidence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर