नागपुरात चोवीस तासात एसटी कंडक्टरसह १२ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 10:25 PM2019-06-05T22:25:54+5:302019-06-05T22:26:40+5:30

उष्माघातामुळे एसटी कंडक्टरसह १२ जणांचा मृत्यू झाला. २४ तासाच्या आत १२ लोकांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दर दोन तासानंतर एका व्यक्तीचा मृत्यू होत आहे. वाढत्या तापमानामुळेच हे घडत असल्याचे मानले जात आहे.

Twenty-five hours in Nagpur, 12 people die with ST conductor | नागपुरात चोवीस तासात एसटी कंडक्टरसह १२ जणांचा मृत्यू

नागपुरात चोवीस तासात एसटी कंडक्टरसह १२ जणांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देजीवघेणे तापमान : बळी उष्माघाताचेच?

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उष्माघातामुळे एसटी कंडक्टरसह १२ जणांचा मृत्यू झाला. २४ तासाच्या आत १२ लोकांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दर दोन तासानंतर एका व्यक्तीचा मृत्यू होत आहे. वाढत्या तापमानामुळेच हे घडत असल्याचे मानले जात आहे.
बँक कॉलनी नरसाळा येथील ५० वर्षीय प्रवीण कडू एस.टी. मध्ये कंडक्टर आहे. ते मंगळवारी सकाळी एसटी स्टँड परिसरातील कार्यालयात टिनाच्या शेडजवळ बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यांच्या तोंडातून फेस येत होता. एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांना मेडिकलमध्ये दाखल केले. तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अंबाझरी चौपाटीजवळ मंगळवारी सायंकाळी ४५ वर्षीय व्यक्ती मृतावस्थेत आढळून आली. जरीपटका येथील नारी गावातील नाल्याजवळ ३५ वर्षीय युवकाचा मृतदेह सापडला. पाचपावलीतील राणी दुर्गावती चौकात फूटपाथवर अज्ञात व्यक्ती मृतावस्थेत आढळून आली. तहसील पोलीस ठाणे हद्द्ीत बोहरा बिल्डिंगजवळ ५५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सापडला. याच परिसरातील तीन नळ चौकातही ४० वर्षीय व्यक्ती बेशुद्धावस्थेत सापडली. त्याला मेयो रुग्णालयात नेले असता डॉक्टरंनी मृत घोषित केले.
त्याचप्रकारे सक्करदरा परिसरातील आशीर्वादनगरात मंगळवारी दुपारी एक व्यक्ती आजारी अवस्थेत सापडली. तिला मेडिकलमध्ये नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. विनोबा भावेनगर हुडकेश्वर येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला. कुकडे ले-आऊट अजनी येथील ५३ वर्षीय सुरेखा अशोक मोटघरे यांना मंगळवारी सकाळी नतेवाईकांनी झोपेतून उठवण्याचा प्रयत्न केला. कुठलाही प्रतिसाद दिला नसल्याने त्यांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले तेव्हा डॉक्टरांनी मृत घोषित केले. काँग्रेसनगर येथील धनवटे नॅशनल कॉलेजसमोर ६७ वर्षीय व्यक्ती आजारी अवस्थेत सापडली. मेडिकलमध्ये उपचार सुरु होते. मंगळवारी तिचा मृत्यू झाला. मेडिकल गेटजवळ बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या व्यक्तीचाही मृत्यू झाला.
गेल्या पंधरवड्यापासून हा प्रकार सुरु आहे. यादरम्यान १०० पेक्षा अधिक लोकांचा वेगवेगळ्या कारणामुळे जीव गेला. रस्त्यावर सापडलेल्या अनेक मृतांची ओळख पटू शकलेली नाही. त्यामुळे त्यांचे मृतदेह सांभाळून ठेवणे आणि अंत्यसंस्कार करण्यामुळे पोलिसांनाही त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील काही पोलीस ठाण्यांमध्ये या कामासाठी विशेष कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते मृताच्या कुटुंबीयांचा शोध घेतात ते न सापडल्यास मृतावर अंत्यसंस्कार करतात.

 

Web Title: Twenty-five hours in Nagpur, 12 people die with ST conductor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.