नागपूर मेट्रो स्टेशनवर तापमानाचा समतोल साधणाऱ्या टाईल्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 11:09 AM2018-03-14T11:09:19+5:302018-03-14T11:09:26+5:30

वर्धा महामार्गावर खापरी ते एअरपोर्ट दरम्यान तिन्ही मेट्रो स्टेशनचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. एअरपोर्ट (साऊथ), न्यू-एअरपोर्ट आणि खापरी मेट्रो स्टेशनवर उच्च दर्जाच्या तापमानाचा समतोल साधणाऱ्या टाईल्स बसविण्यात येणार आहेत.

Tiles that balance the temperature at the Nagpur metro station | नागपूर मेट्रो स्टेशनवर तापमानाचा समतोल साधणाऱ्या टाईल्स

नागपूर मेट्रो स्टेशनवर तापमानाचा समतोल साधणाऱ्या टाईल्स

Next
ठळक मुद्देप्रारंभी तीन स्टेशनवर बांधकामटाईल्स व भिंतीदरम्यान अंतर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वर्धा महामार्गावर खापरी ते एअरपोर्ट दरम्यान तिन्ही मेट्रो स्टेशनचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. स्टेशनच्या रंगरंगोटीला सुरुवात झाली आहे. उल्लेखनीय म्हणजे एअरपोर्ट (साऊथ), न्यू-एअरपोर्ट आणि खापरी मेट्रो स्टेशनवर उच्च दर्जाच्या तापमानाचा समतोल साधणाऱ्या टाईल्स बसविण्यात येणार आहेत.
एअरपोर्ट (साऊथ) स्टेशनचे बांधकाम आधुनिक आर्किटेक पद्धतीने झाले असून यात क्रीम कलरच्या टाईल्सचा वापर मोठ्या प्रमाणात झाला आहे. जर्मनीतील हंटर डग्लस नावाच्या कंपनीने या टाईल्सची निर्मिती केली आहे. त्या आतून पोकळ असतात. टाईल्सची निर्मिती १७०० डिग्री सेंटिग्रेडवर करण्यात येते. टाईल्सला क्रीम कलर येण्यासाठी हेच तापमान कायम ठेवावे लागते, अशी माहिती कंपनीचे प्रतिनिधी संदीप दिवे यांनी दिली आहे.
टेराकोटा टाईल्स तापमान नियंत्रित ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. बाहेर तापमान कितीही असले तरीही स्टेशनच्या आत मात्र तापमानात घट जाणवणार आहे. टाईल्स भिंतीवर बसविण्याची एक कला आहे. टाईल्स आणि भिंतीदरम्यान ७५ मिलिमीटर इतके अंतर राखले जाते. ७५ मिलिमीटरच्या पोकळीत पाण्याचे पाईप, विजेचे तार आणि इतर उपकरणे बसविता येतात आणि पोकळीचा फायदा उष्णता कमी करण्यासाठी होतो. टाईल्सला ब्रॅकेट्सच्या माध्यमाने बसविले जाते.

Web Title: Tiles that balance the temperature at the Nagpur metro station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.