नागपुरात वाहतूक पोलिसांकडून सर्जिकल स्ट्राईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 11:33 PM2018-09-11T23:33:26+5:302018-09-11T23:34:14+5:30

वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन करून अपघात घडविण्यास कारणीभूत ठरणाऱ्या वाहनचालकांना वाहतुकीचे धडे देण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून मंगळवारी चौकाचौकात सर्जिकल स्ट्राईक केला गेला. या विशेष मोहिमेंतर्गत पहिल्याच दिवशी पोलिसांनी १२८५ वाहनचालकांवर चालान कारवाई केली. या कारवाईदरम्यान विद्यार्थ्यांनी जनजागरणही केले.

Surgical Strike from Traffic Police in Nagpur | नागपुरात वाहतूक पोलिसांकडून सर्जिकल स्ट्राईक

नागपुरात वाहतूक पोलिसांकडून सर्जिकल स्ट्राईक

googlenewsNext
ठळक मुद्देविद्यार्थ्यांकडून जनजागरण, पोलिसांकडून कारवाई : पहिल्याच दिवशी १२८५ वाहनचालकांना चालान

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन करून अपघात घडविण्यास कारणीभूत ठरणाऱ्या वाहनचालकांना वाहतुकीचे धडे देण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून मंगळवारी चौकाचौकात सर्जिकल स्ट्राईक केला गेला. या विशेष मोहिमेंतर्गत पहिल्याच दिवशी पोलिसांनी १२८५ वाहनचालकांवर चालान कारवाई केली. या कारवाईदरम्यान विद्यार्थ्यांनी जनजागरणही केले.
वाहतुकीचे नियम तोडण्याची प्रवृत्ती हल्ली बळावली आहे. मोटार वाहन कायद्याच्या तरतुदीप्रमाणे वाहन न चालविता स्वत: आणि इतर नागरिकांच्या जीविताला धोका होईल अशा पद्धतीने काही जण वाहने चालवितात. अनेकांकडे वाहन चालविण्याचा परवानाच नसल्याचे दिसून येते. अनेक वाहनचालकांना मोटार वाहन कायद्याचे ज्ञान नसते. अल्पवयीन मुलेमुली बेदरकारपणे वाहने चालविताना दिसतात. त्यामुळे मोटार वाहन कायद्याची वाहनचालकांना तसेच सर्वसामान्य जनतेला माहिती देण्याकरिता ११ आणि १२ सप्टेंबरला सकाळी ९ ते ११ या वेळेत शहरातील सातही वाहतूक परिमंडळातील सर्व मुख्य चौकात आॅपरेशन सर्जिकल स्ट्राईक राबविण्यात येणार असल्याचे वाहतूक शाखेने जाहीर केले होते. वाहनचालकांनी हेल्मेटसह सर्व कागदपत्रे सोबत बाळगण्याचेही आवाहन करण्यात आले होते. मात्र, त्याला अनेक वाहनचालकांनी दाद दिली नाही. परिणामी, झिरो टॉलरन्स पॉर्इंटअंतर्गत कारवाईची विशेष मोहीम राबविण्यात आली. त्यात १२८५ वाहनचालकांना दंडात्मक कारवाईचा सामना करावा लागला. वाहतूक पोलिसांकडून ही कारवाई सुरू असताना विद्यार्थ्यांनीही जनजागरणासाठी सहभाग नोंदवला. त्यांनी स्लोगन आणि प्रत्यक्ष संवाद साधून वाहनचालकांना वाहतुकीच्या नियमाचे महत्त्व पटवून देण्याचे प्रयत्न केले.

चौकनिहाय कारवाईचे स्वरूप
वाहतुकीच्या नियमाचे सर्रास उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी चौकाचौकात केलेल्या कारवाईचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे. लॉ कॉलेज चौक ५६, व्हेरायटी चौक १०५, जुना काटोल नाका चौक ४०, एलआयसी चौक १५०, वाडी टी-पॉर्इंट १३५, बजाजनगर चौक ५५, तुकडोजी चौक ९६, सक्करदरा चौक ७९, अशोक चौक ६१, अग्रसेन चौक १८५, कडबी चौक १४४ आणि इंदोरा चौकात १७९ अशाप्रकारे एकूण १२८५ वाहनचालकांवर चालान कारवाई करण्यात आली. बुधवारीसुद्धा ही कारवाई केली जाणार आहे.

Web Title: Surgical Strike from Traffic Police in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.