नागपुरातील सूरज शर्मा यांचा सलग १२८ तास गायनाचा महाविक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 10:03 PM2019-03-02T22:03:58+5:302019-03-02T22:07:56+5:30

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त व नेत्रदान आणि अवयवदानाच्या जनजागृतीसाठी सलग १२८ तास गायनाचा नवा विक्रम नागपूरचे तरुण गायक सूरज शर्मा यांनी रचला. या गायनाचा महापराक्रम गिनीज बुक ऑफ रेकॉर्डस्मध्ये नोंदला जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी नागपुरात १०५ तास सलग गायनाचा विक्रम नोंदविण्यात आला होता.

Suraj Sharma of Nagpur, singing record for 128 hours | नागपुरातील सूरज शर्मा यांचा सलग १२८ तास गायनाचा महाविक्रम

नागपुरातील सूरज शर्मा यांचा सलग १२८ तास गायनाचा महाविक्रम

googlenewsNext
ठळक मुद्देगिनीज बुक ऑफ रेकॉर्डर्सचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त व नेत्रदान आणि अवयवदानाच्या जनजागृतीसाठी सलग १२८ तास गायनाचा नवा विक्रम नागपूरचे तरुण गायक सूरज शर्मा यांनी रचला. या गायनाचा महापराक्रम गिनीज बुक ऑफ रेकॉर्डस्मध्ये नोंदला जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी नागपुरात १०५ तास सलग गायनाचा विक्रम नोंदविण्यात आला होता.
युथ वेल्फेअर असोसिएशनतर्फे आयोजित या उपक्रमाला २३ फेब्रुवारीला सकाळी ११.४६ वाजता सुरुवात झाली. २६ फेब्रुवारीला दुपारी सलग ७५ तास पूर्ण झाले होते. त्यानंतर प्रकृती खालवली असताना तातडीने औषधोपचार करण्यात आले. त्यानंतर गायक शर्मा यांनी नव्या जोमाने पुन्हा गायनास सुरुवात केली होती. गुरुवारी सायंकाळी ७.३० वाजता त्यांनी सलग गायनाचे १२८ तास पूर्ण करीत नवा विक्रम रचला आहे. त्यानंतर सूरजला तातडीने खासगी इस्पितळात हलविण्यात आले. शुक्रवारी त्याला सुटी देण्यात आली. सध्या त्याची प्रकृती बरी असल्याचे युथ वेल्फेअर असोसिएशनचे सचिव व उपक्रमाचे आयोजक मनीष पाटील यांनी सांगितले. गिनीज बुक ऑफ रेकॉर्डस्ला येत्या १५ दिवसांत त्याचा व्हिडीओ व आवश्यक दस्तावेज पाठविले जाईल, असेही पाटील म्हणाले.
गायक सूरज शर्माने देशभक्ती गीतांसोबत नवीन व जुनी गीतेही सादर केली. प्रत्येक चार तासानंतर २० मिनिटांच्या ब्रेकमध्ये डॉक्टरचे पथक शर्मा यांच्या प्रकृतीची तपासणी करीत होते. डॉ. विद्यानंद गायकवाड व डॉ. इरफान अहमद हे त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवून होते. पहिल्या दिवसापासून सूरजच्या चारही बहिणी कुटुंबीयांसह इंदोरा चौकातील आयनॉक्स मॉल येथे उपस्थित राहून भावाला प्रोत्साहित करीत होत्या. शर्मा यांचा उत्साह वाढविण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकही सहभागी झाले होते.
चार हजारांपेक्षा नागरिकांचा नेत्रदानाचा संकल्प
या विक्रमादरम्यन नागरिकांना अवयवदान व नेत्रदानाचे आवाहन केले जात होते. यामुळे सहा दिवसांमध्ये चार हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी नेत्रदानाचा अर्ज भरून संकल्प केला.

Web Title: Suraj Sharma of Nagpur, singing record for 128 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.