कोवळ्या मनावर थराराचा शहार

By admin | Published: December 18, 2014 02:42 AM2014-12-18T02:42:22+5:302014-12-18T02:42:22+5:30

सर्वच शाळांमध्ये पेशावरच्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी विद्यार्थी एकत्रित झाले होते.

Strangers on thorns | कोवळ्या मनावर थराराचा शहार

कोवळ्या मनावर थराराचा शहार

Next

नागपूर : सर्वच शाळांमध्ये पेशावरच्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी विद्यार्थी एकत्रित झाले होते. प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर वेदना स्पष्टपणे जाणवित होती. कुणाशीही वैर नसणाऱ्या आणि दहशतवाद म्हणजे काय? याचाही अर्थ माहिती नसणाऱ्या निरागस चिमुकल्यांवर गोळीबार करणारे दहशतवादी माणसे असूच शकत नाही. जगातल्या कुठल्याच धर्माची ही शिकवण नाही, असा विचार व्यक्त करताना जगभरात होत असलेल्या दहशतवादी कृत्यांनी विद्यार्थी भेदरलेले दिसले. प्रत्येक शाळेतले वातावरण सुन्न आणि खिन्नतेने व्यापलेले होते. बऱ्याच शाळांमध्ये स्नेहसंमेलनानिमित्त विविध कार्यक्रम, स्पर्धा आणि खेळांचा सराव सुरु होता पण आज अनेक विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला नाही. वृत्तपत्रातल्या बातम्या आणि छायाचित्रे पाहून मुलांचे डोळे पाणावले होते. (प्रतिनिधी)
मोमीनपुरा, हसनबागेत विद्यार्थ्यांची श्रद्धांजली
पाकिस्तानच्या पेशावर येथील आर्मी शाळेत दहशतवाद्यांनी निष्पाप शाळकरी मुलांची निर्मम हत्या केली. या हत्येने अवघे जग सुन्न झाले. दहशतवादाला कुठलाच धर्म नसतो आणि दहशतवाद हा माणुसकी संपल्यावरच सुरु होतो. शहरातील अनेक शाळांनी पेशावरच्या घटनेचा निषेध, संताप आणि हळहळ व्यक्त करीत या हल्यात मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यात मोमीनपुरा, हसनबाग येथील उर्दु आणि हिंदी शाळेच्या मुस्लीम विद्यार्थ्यांनीही श्रद्धांजली अर्पण करताना या घटनेचा निषेध व्यक्त केला. दहशतवाद्यांनी निष्पाप शाळकरी मुलांची केलेली हत्या या मुलांना धक्का देणारी होती. अशी घटना यानंतर जगात कुठेही घडू नये, यासाठी मुस्लिम विद्यार्थ्यांनी अल्लाहला साकडे घातले. हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांचा कुठलाच धर्म नाही कारण इस्लाम या बाबीला मान्यता देत नाही, असेही या मुलांनी सांगितले.

Web Title: Strangers on thorns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.