खरर्यासाठी थांबणे जीवावर बेतले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 11:56 PM2018-04-09T23:56:55+5:302018-04-09T23:57:13+5:30

खर्रा खाण्याची हुक्की आल्याने चालक मोटरसायकल रोडच्या कडेला थांबवून पानटपरीवर गेला. खर्रा घेऊन परत मोटरसायकलजवळ येताच भरधाव अज्ञात ट्रकने त्याला धडक दिली. त्यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना कन्हान (ता. पारशिवनी) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कांद्री प्रवेशद्वाराजवळ सोमवारी सकाळी ११.२० वाजताच्या सुमारास घडली.

Stopping kharra lost life! | खरर्यासाठी थांबणे जीवावर बेतले !

खरर्यासाठी थांबणे जीवावर बेतले !

googlenewsNext
ठळक मुद्देट्रकच्या धडकेत ठार : नागपूर जिल्ह्यातील कांद्री परिसरातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
कन्हान : खर्रा खाण्याची हुक्की आल्याने चालक मोटरसायकल रोडच्या कडेला थांबवून पानटपरीवर गेला. खर्रा घेऊन परत मोटरसायकलजवळ येताच भरधाव अज्ञात ट्रकने त्याला धडक दिली. त्यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना कन्हान (ता. पारशिवनी) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कांद्री प्रवेशद्वाराजवळ सोमवारी सकाळी ११.२० वाजताच्या सुमारास घडली.
किसन हिराचंद लोढेकर (४५, रा. रेवराळ, ता. मौदा) असे मृताचे नाव आहे. किसन व अजय खेमचंद खरोले (२१, रा. बोरीखेडा, जिल्हा बालाघाट मध्य प्रदेश) हे दोघेही वराडा शिवारातील विहीर खोदकामासाठी आले होते. त्यांनी कामठी येथून एमएच-४०/एएफ-५८५६ क्रमांकाच्या मोटरसायकलने वराडा येथे जात होते. किसनला खर्रा खाण्याची हुक्की आल्याने त्याने मोटरसायकल कांद्री येथील प्रवेशद्वाराजवळ थांबविली व खर्रा विकत घेण्यासाठी पानटपरीवर गेला. अजय मोटरसायकलजवळच उभा राहिला. किसन खर्रा घेऊन परत येत असतानाच कन्हानहून रामटेकच्या दिशेने वेगात जाणाऱ्या ट्रकने त्याला मागून धडक दिली. त्यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
धडक देताच ट्रकचालक ट्रकसह पळून गेला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी कन्हान पोलिसांनी अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

Web Title: Stopping kharra lost life!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.