दपूम रेल्वेत पेन्शन अदालतीचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 10:52 PM2019-03-18T22:52:20+5:302019-03-18T22:53:43+5:30

रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात कार्मिक विभागाने विभागीय रेल्वे व्यवस्थापकांच्या सभाकक्षात पेन्शन अदालतीचे आयोजन केले.

South Eastern Central railway pensions court organised | दपूम रेल्वेत पेन्शन अदालतीचे आयोजन

दपूम रेल्वेत पेन्शन अदालतीचे आयोजन

Next
ठळक मुद्दे२१ प्रकरणे दाखल ,५ प्रकरणांचा निपटारा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात कार्मिक विभागाने विभागीय रेल्वे व्यवस्थापकांच्या सभाकक्षात पेन्शन अदालतीचे आयोजन केले.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात आयोजित पेन्शन अदालतीला अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक बी. के. रथ, वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी आर. गणेश, वरिष्ठ विभागीय वित्त व्यवस्थापक आर. के. सेठी, कार्मिक आणि वित्त विभागाचे सदस्य उपस्थित होते. पेन्शन अदालतीत विभागीय कार्मिक अधिकारी व्ही. व्ही. फाटक यांनी पेन्शन अदालतीचे अध्यक्ष अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक बी. के. रथ, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे पेन्शनर्स असोसिएशनचे प्रतिनिधी आणि अर्जदारांचे स्वागत केले. पेन्शन अदालतीत एकूण २१ प्रकरणे दाखल झाली. त्यातील ५ प्रकरणांचा निपटारा करून १६ प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी योग्य कारवाई करण्यात आली. पेन्शन अदालतीच्या यशस्वीतेसाठी कार्मिक आणि वित्त विभागाने सहकार्य केले.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात आयोजित पेन्शन अदालतीला उपस्थित अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक बी. के. रथ, वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी आर. गणेश, अधिकारी आणि पेन्शनधारक.

Web Title: South Eastern Central railway pensions court organised

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.