भारतीय राष्ट्रध्वजावर बुद्धाचे तत्त्वज्ञान अंकित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 09:47 PM2018-02-24T21:47:51+5:302018-02-24T21:48:17+5:30

भारतीय राष्ट्रध्वजावर सम्राट अशोक यांचे धम्मचक्र अंकित आहे. अशोकाचे हे धम्मचक्र म्हणजे बुद्धाने सांगितलेला कार्यकारणभाव (प्रतित्य समुत्पाद) होय, असे प्रतिपादन इंग्लंडमधील बौद्ध विचारवंत व साहित्यिक धम्मचारी सुभूती यांनी येथे केले.

Significance of the philosophy of Buddha on the Indian National Flag | भारतीय राष्ट्रध्वजावर बुद्धाचे तत्त्वज्ञान अंकित

भारतीय राष्ट्रध्वजावर बुद्धाचे तत्त्वज्ञान अंकित

Next
ठळक मुद्देधम्मचारी सुभूती : अशोक चक्र म्हणजे प्रतित्य समुत्पाद

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय राष्ट्रध्वजावर सम्राट अशोक यांचे धम्मचक्र अंकित आहे. अशोकाचे हे धम्मचक्र म्हणजे बुद्धाने सांगितलेला कार्यकारणभाव (प्रतित्य समुत्पाद) होय, असे प्रतिपादन इंग्लंडमधील बौद्ध विचारवंत व साहित्यिक धम्मचारी सुभूती यांनी येथे केले.
दीक्षाभूमीवर सुरू असलेल्या बुद्ध महोत्सवात शनिवारी रत्नावली व्याख्यानमालेंतर्गत धम्मचारी सुभूती यांनी प्रतित्य समुत्पाद (कार्यकारणभाव) या विषयावर मार्गदर्शन केले. धम्मचारी सुभूती म्हणाले, भारतीय राष्ट्रध्वजावर तीन रंगासह मध्यभागी अशोक चक्र आहे. सारनाथ येथील स्तंभावरून ही प्रतिकृती घेण्यात आली आहे. यासाठी राष्ट्रीय ध्वज समितीच्या बैठकीत बरीच चर्चा झाली. तेव्हा राष्ट्रध्वजावर अशोक चक्रच का असावे, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पटवून दिले. अशोक चक्र हे शांतीपूर्ण क्रांतीचे प्रतीक आहे. अशोककालीन भारत विशाल व कसा एकसंध व शांतीपूर्ण होता, हे दर्शविणारे ते प्रतीक आहे. म्हणून ते भारतीय राष्ट्रध्वजावर अंकित आहे.
अशोकाचे हे चक्र धम्मचक्राचे वैश्विक प्रतीक होय. अशोक चक्रामध्ये २४ आर्य आहेत. हे २४ आर्य दु:खाचे निदान आहेत. यपैकी १२ आर्य हे दु:खाचे कारण सांगतात तर उर्वरित १२ आर्य त्यापासून कशी मुक्ती मिळविता येते ते सांगतात. मानवाच्या दु:खाचे निदान दर्शविणारे अशोक चक्र म्हणूनच समस्त जगातील मानवासाठी महत्त्वाचे आहे, असेही धम्मचारी सुभूती म्हणाले. धम्मचारिणी मोक्षसारा यांनी त्यांच्या इंग्रजी व्याख्यानाचा हिंदी अनुवाद केला.

चीनचा व्यायाम व नेदरलँडचे संगीत
बुद्ध महोत्सवात शनिवारी चीनची व्यायाम कला व नेदरलँडचे संगीत आकर्षणाचे केंद्र ठरले. सकाळ व दुपारच्या सत्रामध्ये इंग्लंडचे मास्टर सिफू स्टीवन यांनी चायनीज व्यायाम कला चि कूंग चे सादरीकरण केले. सकाळी सर्वांनी याचा लाभ घेतला. तर दुपारच्या सत्रात केवळ डॉक्टरांसाठी विशेषत्वाने हा व्यायामाचा प्रकार सांगण्यात आला. सायंकाळच्या सत्रामध्ये नेदरलँडमधील नामग्याल ल्हामो यांनी आपल्या संगीताच्या माध्यमातून लक्ष्य वेधले.
दीक्षाभूमीवर सुरू असलेल्या बुद्ध महोत्सवाचा समारोप रविवारी करण्यात येईल. सकाळ व दुपारच्या सत्रात चायनीज व्यायाम कला शिकवली जाईल. तर सायंकाळी रत्नावली व्याख्यानमाला होईल. सायंकाळी ७.३० वाजता समारोपीय समारंभ होईल. त्यानंतर मित्रलोकची चमू मैत्रीगीत सादर करतील.

Web Title: Significance of the philosophy of Buddha on the Indian National Flag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.