लग्नाचे आमीष दाखवून करीत होता अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 09:49 PM2018-09-13T21:49:15+5:302018-09-13T21:52:46+5:30

लग्नाचे आमीष दाखवून ३२ वर्षीय एक युवक वर्षभरापासून एका तरुणीवर अत्याचार करीत होता. काही दिवसांपासून प्रेयसीने लग्नासाठी दबाव टाकला असता युवकाने लग्न करण्यास नकार दिला. तरुणीच्या तक्रारीवरून वाडी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Showing lure of marriage raped | लग्नाचे आमीष दाखवून करीत होता अत्याचार

लग्नाचे आमीष दाखवून करीत होता अत्याचार

googlenewsNext
ठळक मुद्देतरुणीची तक्रार : वाडीत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लग्नाचे आमीष दाखवून ३२ वर्षीय एक युवक वर्षभरापासून एका तरुणीवर अत्याचार करीत होता. काही दिवसांपासून प्रेयसीने लग्नासाठी दबाव टाकला असता युवकाने लग्न करण्यास नकार दिला. तरुणीच्या तक्रारीवरून वाडी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नंदकिशोर साहेब शर्मा रा. इंद्रायणीनगर वाडी असे आरोपीचे नाव आहे. आरोपी नंदकिशोर हा सीताबर्डी येथील एका मॉलमध्ये लेडिज फुटवेयर शॉपमध्ये कर्मचारी आहे. पीडित २८ वर्षीय तरुणी कॉस्मेटिक प्रोडक्ट कंपनीत काम करते. जानेवारी २०१७ मध्ये तरुणी सीताबर्डी येथे मेकअप आर्टिस्ट म्हणून कार्यरत होती. नंदकिशोर त्याच मॉलमध्ये काम करीत असल्याने दोघांची ओळख होती. फेब्रुवारी २०१७ मध्ये नंदकिशोरने तरुणीला ‘प्रपोज’ केले. तिनेही होकार दिला. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. दरम्यान नंदकिशोरने तिला लग्नाचे वचन दिले. तरुणीने त्याची आपले वडील आणि नातेवाईकांशी भेट घालून दिली. त्यांनाही मुलीचा निर्णय मान्य होता. त्यामुळे नंदकिशोर त्यांच्या घरी कधीही येऊ जाऊ लागला. मे २०१७ मध्ये नंदकिशोरने तरुणीला आपल्या इंद्रायणीनगर येथील घरी बोलावले. त्यावेळी त्याच्या घरी कुणीही नव्हते. तेव्हा त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यानंतर दोघे शेगावला गेले. तिथे मंगळसूत्र घालून तिचा आपली पत्नी म्हणून स्वीकार केला. त्यानंतर शेगाव, महाबळेश्वर आणि कधीकधी आपल्या घरी बोलावून तो तिच्यावर अत्याचार करीत होता. लग्नाची गोष्ट निघाली की लहान बहिणीचे लग्न झाले की आपण लग्न करू असे तो तिला सांगायचा. परंतु लहान बहिणीचे लग्न झाल्यानंतर त्याने तरुणीशी लग्न करण्यास नकार दिला. यनंतर तरुणी त्याच्या घरी गेली असता त्याच्या घरच्यांनीसुद्धा तिला धमकावले. अखेर पीडित तरुणीने पोलिसात धाव घेतली. वाडी पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.

आरोपीला दिली संधी
पीडित तरुणी आणि तिचे कुटुंबीय वाडीचे ठाणेदार नरेश पवार आणि सामाजिक कार्यकर्त्या सुनीता ठाकरे यांना भेटले. पीआय पवार यांनी नंदकिशोरला समजावण्याचा प्रयत्न केला. सामाजिक कार्यकर्त्या ठाकरे यांनीसुद्धा आरोपीला समजावून लग्नासाठी तयार करण्याचा प्रयत्न केला. परंतु नंदकिशोर ऐकायलाच तयार नव्हता. अखेर बुधवारी पोलिसांनी तक्रार दाखल केली.

Web Title: Showing lure of marriage raped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.