एलईडी मासेमारी बंद करण्याची शिवसेनेच्या आमदारांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2018 14:52 IST2018-07-17T14:51:36+5:302018-07-17T14:52:36+5:30
पारंपरिक व्यवसाय करणा-या मासेमा-यांवर बेकारीची कु-हाड कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही पद्धत तात्काळ बंद करावी, अशी मागणी शिवसेनेनं केली आहे.

एलईडी मासेमारी बंद करण्याची शिवसेनेच्या आमदारांची मागणी
नागपूर - समुद्रात एलईडीचा प्रकाश टाकून मासेमारी करणा-या खासगी कंपन्यांमुळे पारंपरिक व्यवसाय करणा-या मासेमा-यांवर बेकारीची कु-हाड कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही पद्धत तात्काळ बंद करावी, अशी मागणी शिवसेनेचे आमदार वैभव नाईक, सुनील शिंदे, अशोक पाटील यांच्यासह अमित घोडा व शांताराम मोरे यांनी सभागृहाबाहेर केली.
एलईडीचा प्रखर प्रकाशाच्या मदतीनं समुद्रात मासेमारी करण्याची ही पद्धत माशांसाठीही घातक असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
मासेमारी करताना शासकीय नियमांची अंमलबजावणी योग्यरित्या व्हावी, यासाठी एका स्वतंत्र कक्षाची स्थापना केली जावी, अशीही मागणी यावेळी त्यांनी केली.