नागपुरात  एसबीआयला १८ लाख, ६८ हजारांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 11:54 PM2018-08-24T23:54:09+5:302018-08-24T23:54:49+5:30

वाहन विकत घेण्याच्या नावाखाली कर्ज घेतल्यानंतर ती रक्कम हडपून बँकेला फसविणाऱ्या तिघांविरुद्ध गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

SBI has cheated by 18 lakh 68 thousand Rs in Nagpur | नागपुरात  एसबीआयला १८ लाख, ६८ हजारांचा गंडा

नागपुरात  एसबीआयला १८ लाख, ६८ हजारांचा गंडा

Next
ठळक मुद्देकर्ज घेतले, वाहन घेतलेच नाही : गिट्टीखदानमध्ये गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाहन विकत घेण्याच्या नावाखाली कर्ज घेतल्यानंतर ती रक्कम हडपून बँकेला फसविणाऱ्या तिघांविरुद्ध गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
सुनील वसंतराव चरपे (वय २७, रा. सावरबांधे लेआऊट हुडकेश्वर), रिजवान अहमद शरिफ अहमद (वय ३४, रा. नयापुरा सेवासदन चौक) आणि तरबेज खान इस्माईल खान (वय ३३, रा. लष्करीबाग, बाबा संतोष अपार्टमेंट) अशी आरोपींची नावे आहेत.
स्टेट बँक आॅफ इंडियाच्या सेमिनरी हिल शाखेतून उपरोक्त तिघांनी २४ आॅगस्ट २०१४ ला वेगवेगळी कर्ज प्रकरणे सादर करून २२ लाख, ५० हजारांचे कार लोन घेतले. प्रत्यक्षात त्यांनी कार विकतच घेतली नाही. ही रक्कम त्यांनी स्वत:च वापरली. कर्जाचे हप्ते भरण्याच्या नावाखाली त्यांनी ५ लाख, १० हजार, ४५५ रुपये बँकेत जमा केले. नंतर मात्र त्यांनी उर्वरित रक्कम तसेच व्याज असे एकूण १८ लाख, ६८ हजार, २९४ रुपये बँकेत जमा न करता बँकेची फसवणूक केली. त्यांना वारंवार नोटीस देऊनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे बँकेच्या व्यवस्थापक सुनीता राऊत (वय ३७, रा. हजारीपहाड) यांनी गिट्टीखदान ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी प्रकरणाची चौकशी केल्यानंतर गुरुवारी गुन्हा दाखल केला. आरोपी चरपे, रिजवान आणि तरबेजची चौकशी केली जात आहे.

Web Title: SBI has cheated by 18 lakh 68 thousand Rs in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.