युवा प्रबोधनकार तुषार सूर्यवंशी यांना संत चोखामेळा साहित्य पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 10:50 AM2019-01-14T10:50:42+5:302019-01-14T10:51:10+5:30

यंदाचा संत चोखामेळा साहित्य पुरस्कार महराष्ट्रातील ख्यातनाम सप्तखंजेरीवादक, युवा प्रबोधनकार तुषार सूर्यवंशी यांना जाहीर करण्यात आला आहे. सामाजिक न्याय मंत्री व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजकुमार बडोले यांनी रविवारी नागपुरात याची घोषणा केली.

Saint Chokhamela Sahitya Award for Young Prabodhankar Tushar Suryavanshi | युवा प्रबोधनकार तुषार सूर्यवंशी यांना संत चोखामेळा साहित्य पुरस्कार

युवा प्रबोधनकार तुषार सूर्यवंशी यांना संत चोखामेळा साहित्य पुरस्कार

googlenewsNext
ठळक मुद्देसामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांची घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सार्वजनिक उपक्रमांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान यांच्यावतीने सामाजिक क्षेत्रात अमूल्य योगदान करणारे, कीर्तनाच्या, प्रबोधनाच्या व गीतांच्या माध्यमातून समाजात महापुरुषांचे संत महात्म्यांचे विचार पोहचविण्याकरिता प्रबोधन करणाऱ्या कलाकारांना संत चोखामेळा पुरस्कार देण्यात येतो. पुरस्काराचे हे दुसरे वर्ष असून संत चोखामेळा यांच्या जयंतीचे औचित्य साधून यंदाचा संत चोखामेळा साहित्य पुरस्कार महराष्ट्रातील ख्यातनाम सप्तखंजेरीवादक, युवा प्रबोधनकार तुषार सूर्यवंशी यांना जाहीर करण्यात आला आहे. सामाजिक न्याय मंत्री व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजकुमार बडोले यांनी रविवारी नागपुरात याची घोषणा केली.
तुषार सूर्यवंशी यांनी संपूर्ण महाराष्ट्र तसेच आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगड, पंजाब इत्यादी राज्यांमध्ये संविधान जनजागृती, ग्राम स्वच्छता अभियान, आदर्श गाव, तंटामुक्ती अभियान, व्यसनमुक्ती, निर्मल ग्राम, शिक्षण, आरोग्य, बालसंस्कार, शासनच्या जनकल्याणकारी योजना, परिवर्तनवादी विचार, नेत्रदान-देहदान-रक्तदान इत्यादी विषयामधून फुले, शाहू, आंबेडकर, संत गाडगेबाबा, संत चोखामेळा, संत तुकडोजी महाराज, संत कबीर, अण्णाभाऊ साठे, संत रविदास इत्यादी संत महापुरुषांचे परिवर्तनवादी विचार समाजातील तळागाळापर्यंत प्रबोधनाच्या माध्यमातून पोहचविण्याचे कार्य केले आहे. तुषार सूर्यवंशी यांनी संपूर्ण भारतात १८०० पेक्षा अधिक कार्यक्रम सादर केले आहेत. आतापर्यंत तुषार सूर्यवंशी यांना विदर्भ गौरव पुरस्कार, महाराष्ट्र रत्न पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा व्यसनमुक्ती पुरस्कार, समाजप्रबोधन पुरस्कार, नागपूर भूषण पुरस्कार, युवा कलारत्न पुरस्कार, फुले-शाहू आंबेडकर समता पुरस्कार असे विविध ४५ पेक्षा अधिक पुरस्कार मिळाले आहे. त्यांच्या या प्रबोधनाच्या कार्याची दखल घेत शासनाने त्यांना यंदाचा चोखामेळा पुरस्कार घोषित केला आहे. या पुरस्काराचे वितरण दिल्ली येथे होणाºया कार्यक्रमात प्रदान केले जाईल.

शेवटच्या श्वासापर्यंत प्रबोधनाचे कार्य सुरू राहील
‘आम्ही सप्तखंजेरीच्या माध्यमातून संत महापुरुषांचे विचार, भारतीय संविधान घराघरात पोहोचवण्याचे कार्य करतो. आमच्या या कार्याची शासनाने दखल घेऊन पुरस्कार दिल्यास आमचाही उत्साह वाढतो. शासनाचा पुरस्कार म्हणजे शेवटी लोकांचाच पुरस्कार होय, लोकांच्या या पुरस्काराने आमची जबाबदारी अधिक वाढली आहे. अधिक जोमाने काम करीत शेवटच्या श्वासापर्यंत संत महापुरुषांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवत राहणार’, असे सप्तखंजेरीवादक तुषार सूर्यवंशी म्हणाले.

Web Title: Saint Chokhamela Sahitya Award for Young Prabodhankar Tushar Suryavanshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.