धावणार माझी मेट्रो : फिडर सर्व्हिसेससाठी कर्मचारी उत्सुक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 08:39 PM2019-02-05T20:39:55+5:302019-02-05T20:40:46+5:30

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या फिडर सर्व्हिसेस अंतर्गत मिहान येथील हिंदुस्थान कॉम्पुटर लिमिटेडच्या (एचसीएल) अधिकाऱ्यांनी सायकल आणि ई-सायकलची मागणी केली आहे.

Run my metro: Employees eager for feeder services | धावणार माझी मेट्रो : फिडर सर्व्हिसेससाठी कर्मचारी उत्सुक 

धावणार माझी मेट्रो : फिडर सर्व्हिसेससाठी कर्मचारी उत्सुक 

Next
ठळक मुद्देकर्मचाऱ्यांची ई-सायकलची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या फिडर सर्व्हिसेस अंतर्गत मिहान येथील हिंदुस्थान कॉम्पुटर लिमिटेडच्या (एचसीएल) अधिकाऱ्यांनी सायकल आणि ई-सायकलची मागणी केली आहे.
यामुळे कंपनीचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी कार्यालय ते खापरी मेट्रो स्टेशनपर्यंत सायकलचा वापर करू शकतील. इतकेच नव्हे तर कंपनी परिसरातदेखील सायकल चालवायला आवडेल, अशी इच्छा येथील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. महामेट्रो नागपूरच्या ‘धावणार माझी मेट्रो मोहिमेंतर्गत’ मिहान येथे एचसीएल कंपनीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कर्मचाऱ्यांनी महामेट्रोच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
महामेट्रो नागपूरच्या धावणार माझी मेट्रो मोहिमेला कर्मचाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. महामेट्रो अधिकाऱ्यांशी संवाद साधत असताना कर्मचाऱ्यांसाठी ही मोहीम आकर्षणाचे केंद्र ठरली आहे. अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांनी ‘धावणार माझी मेट्रो’सोबत सेल्फी काढली. तसेच महामेट्रोतर्फे फिडर सर्व्हिसेससंबंधी सविस्तर माहिती कर्मचाऱ्यांना देण्यात आली. या माहितीच्या आधारावर ऑनलाईन प्रश्न मंजूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सभागृहात उपस्थित सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना एलसीडी स्क्रीनवरून महामेट्रो नागपूर आणि फिडर सर्व्हिसेससंबंधी प्रश्न विचारण्यात आले. सर्वांनी प्रश्नांची उत्तरे आपल्या मोबाइलवरून दिली. विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे प्रदान करण्यात आलीत.
‘धावणार माझी मेट्रो’वर कर्मचाऱ्यांनी महामेट्रोला शुभेच्छा दिल्या. महामेट्रोने वितरित केलेल्या सूचना पत्रावर कर्मचाऱ्यांनी सूचना व अपेक्षा व्यक्त केल्या. दिलेल्या सूचनांवर विचार करून त्या सूचना पाळण्याचे आश्वासन महामेट्रोच्या अधिकाऱ्यांतर्फे देण्यात आले. लवकरच महामेट्रो नागपूर प्रकल्पाचा व्यावसायिक रन सुरू होणार आहे. नागरिकांनी मेट्रोतून मोठ्या संख्येने प्रवास करावा. त्यामुळे रस्त्यावर होणारे प्रदूषण कमी होईल आणि फिडर सर्व्हिसेसला खऱ्या अर्थाने यश प्राप्त होणार आहे.

Web Title: Run my metro: Employees eager for feeder services

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.