नागपुरात  चाकूच्या धाकावर दोन चिमुकल्यांवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 12:31 AM2019-02-28T00:31:54+5:302019-02-28T00:33:41+5:30

चार व सहा वर्षाच्या चिमुकल्यांना चाकूचा धाक दाखवून बलात्कार केल्याची संतापजनक घटना लकडगंज परिसरात मंगळवारी सायंकाळी घडली. आरोपी फरार असून या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापासह दहशत पसरली आहे.

Raped on two minor girls in Nagpur | नागपुरात  चाकूच्या धाकावर दोन चिमुकल्यांवर अत्याचार

नागपुरात  चाकूच्या धाकावर दोन चिमुकल्यांवर अत्याचार

Next
ठळक मुद्देआरोपी फरार : लकडगंज परिसरातील पालकांमध्ये दहशत

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चार व सहा वर्षाच्या चिमुकल्यांना चाकूचा धाक दाखवून बलात्कार केल्याची संतापजनक घटना लकडगंज परिसरात मंगळवारी सायंकाळी घडली. आरोपी फरार असून या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापासह दहशत पसरली आहे.
मिनिमातानगर येथे मंगळवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास सहा वर्षाची एक चिमुकली शेजारी राहणाऱ्या चार वर्षाच्या चिमुकलीसोबत घरासमोर खेळत होती. दरम्यान एक अनोळखी आरोपी तिथे आला. त्याने दोन्ही मुलींजवळ येऊन त्यांना घरी सोडून देतो असे सांगितले. यावर मोठ्या मुलीने नकार दिला. तेव्हा आरोपीने लहान मुलीला कडेवर घेतले आणि तिचा लाड करू लागला. तेव्हा मोठी मुलगीही त्याचा हात धरून त्याच्यासोबत निघाली. आरोपीने दोन्ही मुलींना मिनिमातानगरच्या रेल्वे लाईनजवळ असलेल्या हल्दीराम फॅक्टरीच्या मागच्या निर्जन स्थळी नेले. तिथे चाकूचा धाक दाखवून दोन्ही मुलींवर बलात्कार केला आणि फरार झाला. या घटनेनंतर दोन्ही मुली हातात कपडे पकडून भटकत होत्या. एका मजुराचे मुलींकडे लक्ष गेले. मुलींच्या कपड्यावर रक्ताचे डाग पाहून त्याला संशय आला. त्याने दोन्ही मुलींना विचारपूस करून त्यांच्या घरापर्यंत पोहोचवले. मुलींच्या कुटुंबीयांनी लगेच लकडगंज पोलिसांना सूचना दिली. यानंतर आरोपीविरुद्ध बलात्कार व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.
घरासमोरही मुले सुरक्षित नाही
या घटनेनंतर घरासमोर खेळत असलेली मुलेही सुरक्षित नसल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. लकडगंज परिसरातील पालकांमध्ये संतापासह दहशतीचे वातावरण आहे.

Web Title: Raped on two minor girls in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.