गारपिटीसह पावसाचा तडाखा, विदर्भात पिकांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 04:43 AM2019-01-26T04:43:23+5:302019-01-26T04:43:37+5:30

शुक्रवारी मध्यरात्रीपासून विदर्भातील काही भागाला अवकाळी पावसाने झोडपले. यात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

Rainfall with hailstorm, crop damage to Vidarbha | गारपिटीसह पावसाचा तडाखा, विदर्भात पिकांचे नुकसान

गारपिटीसह पावसाचा तडाखा, विदर्भात पिकांचे नुकसान

googlenewsNext

नागपूर : शुक्रवारी मध्यरात्रीपासून विदर्भातील काही भागाला अवकाळी पावसाने झोडपले. यात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. रब्बी पिकासह भाजीपाल्यालाही याचा फटका बसला आहे. भंडारा आणि वर्धा जिल्ह्यात अनेक ठिकाणी गारा पडल्याने पीक भुईसपाट झाले आहे. नागपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, गोंदिया जिल्ह्यातही मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.
शुक्रवारी मध्यरात्री १२ पासूनच नागपूरसह विदर्भात अनेक ठिकाणी तुरळक व मुसळधार पावसाला सुरूवात झाली. भंडारा जिल्ह्यात भंडारा, साकोली, मोहाडी, पवनी यासह सर्वच तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. विशेष म्हणजे फक्त मोहाडी शहरात गारपीटीसह पाऊस बरसला. यामुळे गहू, हरभरा, लाखोरी, मुंग, उडीद या पिकांसह भाजीपाल्याचे नुकसान झाल्याचे प्राथमिक माहिती आहे.
नागपूर जिल्ह्यात हिंगणा, मौदा, पारशिवणी भागातही मुसळधार पाऊस झाला. गडचिरोली जिल्ह्यात ४.३० वाजेच्या सुमारास आरमोरीसह काही भागात तुरळक पावसाने हजेरी लावली. वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यात गुरुवारी रात्री व शुक्रवारी पहाटे अवकाळी पावसाने हजेरी लावली.
दरम्यान, २६ जानेवारी रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. २७ जानेवारी रोजी मध्य महाराष्ट्र, तसेच मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. २८ जानेवारी रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
>राज्यात गारवा वाढला
मध्यंतरी कमी झालेला थंडीचा कडाका राज्यासह मुंबईत पुन्हा एकदा वाढला आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाºया शीत वाºयामुळे राज्यासह मुंबई गारठली आहे. सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर येथे ९ अंश सेल्सिअस नोंदविले आहे.

Web Title: Rainfall with hailstorm, crop damage to Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.