क्रिकेट सट्टा अड्डयावर धाड, चार सट्टेबाज जाळ्यात

By दयानंद पाईकराव | Published: May 11, 2024 05:03 PM2024-05-11T17:03:09+5:302024-05-11T17:04:09+5:30

Nagpur : ५.७१ लाखांचा मुद्देमाल जप्त; गुन्हे शाखेच्या युनिट २ ची कारवाई

Raid on cricket betting site, four bookies arrested | क्रिकेट सट्टा अड्डयावर धाड, चार सट्टेबाज जाळ्यात

Raid on cricket betting site, four bookies arrested

नागपूर : आयपीएल क्रिकेट मॅचवर खायवाडी करणाऱ्या चार आरोपींना अटक करून गुन्हे शाखेच्या युनिट २ ने त्यांच्या ताब्यातून ५ लाख ७१ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

फरहान अली लियाकत अली (२८, रा. गवळीपूरा, गांधीबाग), शोहेब अली शाकीब अली सैय्यद (३८, रा. १७५, समाज भुषन सोसायटी, जाफर नगर), ईमरान अली जाहीर अली (४२, रा. बडी मस्जीदजवळ भंडारा रोड, सतरंजीपूरा) आणि ईरशाद रफीक कुरेशी (३६, रा. दिघोरी नाका, मोतीलाल नगर) अशी अटक करण्यात आलेल्या सट्टेबाजांची नावे आहेत. गुन्हे शाखेच्या युनिट २ मधील अधिकारी व अंमलदारांना शुक्रवारी १० मे रोजी मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कार्तिकनगर, बोधड ले आऊट येथे आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा सुरु असल्याची गोपनिय माहिती मिळाली. पोलिसांनी तेथे धाड टाकली असता आरोपी चेन्नई सुपर किंग्जस विरुद्ध गुजरात टाईटन्सवर मोबाईलवर संभाषण करून आॅनलाईन खायवडी करताना आढळले.

आरोपींच्या ताब्यातून २१ मोबाईल, दोन टॅब, दोन लॅपटॉप, बॅटरी, लाईन बॉक्स, तीन दुचाकी असा एकुण ५ लाख ७१ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरुद्ध कलम ४, ५ जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यांना मानकापूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

Web Title: Raid on cricket betting site, four bookies arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.