सेंट्रल लाईनच्या मार्किंगनंतर संपत्तीचे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 11:20 PM2018-08-17T23:20:07+5:302018-08-17T23:21:17+5:30

मेयो हॉस्पिटल ते सुनील हॉटेलदरम्यान जुना भंडारा रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव गेल्या दोन दशकांपासून प्रलंबित आहे. पण कोर्टाच्या निर्देशानंतर ३.२८ कि़मी. लांबीच्या या रस्त्यावर मार्किंग प्रक्रिया सुरू झाली आहे.

Property survey after the central line marking | सेंट्रल लाईनच्या मार्किंगनंतर संपत्तीचे सर्वेक्षण

सेंट्रल लाईनच्या मार्किंगनंतर संपत्तीचे सर्वेक्षण

Next
ठळक मुद्देजुना भंडारा रोड : ३.२८ कि़मी. रस्त्याचे रुंदीकरण, पावसामुळे मार्किंगच्या कामात अडथळा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेयो हॉस्पिटल ते सुनील हॉटेलदरम्यान जुना भंडारा रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव गेल्या दोन दशकांपासून प्रलंबित आहे. पण कोर्टाच्या निर्देशानंतर ३.२८ कि़मी. लांबीच्या या रस्त्यावर मार्किंग प्रक्रिया सुरू झाली आहे.
मनपाच्या नगररचना विभागाच्या मार्गदर्शनात गांधीबाग झोनतर्फे मार्किंग करण्यात येत आहे. गुुरुवारी मेयो हॉस्पिटल ते गांजाखेतपर्यंत एक कि़मी.पर्यंत मार्किंग करण्यात आले आहे. उर्वरित रस्त्याचे मार्किंग आठवड्यात पूर्ण होणार असल्याची माहिती झोनच्या अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना दिली. पावसामुळे सेंट्रल लाईनच्या मार्किंगमध्ये समस्या येत आहे. दुसरीकडे सिटी सर्वे २७ आॅगस्टपासून रस्त्याच्या रुंदीकरणामुळे प्रभावित होणाºया संपत्तीचे सर्वेक्षण करणार आहे. सर्वेक्षण पूर्ण करण्याची अंतिम तारीख अजूनही निश्चित केलेली नाही.
सोमवार, १३ आॅगस्टपासून रस्त्याच्या मध्यभागात मार्किंगचे काम सुरू झाले. गुरुवारपर्यंत गांजाखेतपर्यंत मार्किंग पूर्ण झाले आहे. आता तीननल चौक ते शहीद चौक या मार्गाने सुनील हॉटेलपर्यंत मार्किंग होणार आहे. वर्ष २०११ मध्ये मार्किंग करण्यात आले होते, पण ते आता गायब झाले आहे. त्यामुळे नव्याने मार्किंगचे काम सुरू केले आहे. गांधीबाग झोनच्या मार्गदर्शनात काम सुरू आहे. शुक्रवारी सुटी असल्यामुळे काम बंद होते.
प्राप्त महितीनुसार, मनपातर्फे सेंट्रल लाईनचे मार्किंग केले जाईल. त्यानंतर संपत्तीच्या मार्किंगचे काम सिटी सर्व्हेला करायचे आहे. रस्त्याच्या रुंदीकरणामुळे प्रभावित होणाऱ्या संपत्तीच्या सर्वेक्षणासाठी मनपाने सिटी सर्वेला २९.४६ लाख रुपये अदा केले आहे. सिटी सर्वे विभाग क्र.-१ ला हे काम दिले आहे.
४५० संपत्ती तुटण्याचे संकेत
संबंधित रस्त्याच्या रुंदीकरणात सुमारे ४५० संपत्ती तुटण्याचे संकेत आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रभावित होणाऱ्या संपत्तीला मनपाने नोटीस जारी करून भरपाई देण्याकरिता टीडीआर, एफएसआय अथवा रोख भुगतानाचा पर्र्याय दिला आहे. संबंधित रस्त्याच्या रुंदीकरणाकरिता मनपाला ६०० ते ७०० कोटी रुपयांची भरपाई द्यावी लागेल. ही बाब मनपासाठी महागडी ठरणार आहे. सिटी सर्व्हेचा अहवाल आल्यानंतरच वास्तविकता स्पष्ट होणार आहे.

रस्ता होणार ६० ऐवजी ८० फूट रुंद
जुना भंडारा रस्त्याच्या रुंदीकरणाच्या डीपीआरमध्ये हा रस्ता ८० फूट रुंद करण्याचा प्रस्ताव आहे. त्यानंतरही लोकांमध्ये रस्ता ६० फूट रुंद होणार असल्याची माहिती प्रसारित करण्यात येत आहे. मनपाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, डीपीआरमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केलेला नाही. संबंधित रस्ता ८० फुटाचा होणार असून रुंदी कमी करण्यात आलेली नाही. मार्किंग पूर्ण झाल्यानंतर प्रभावितांसोबत चर्चा करण्यात येईल. त्यानंतरच काम सुरू होईल. रस्ता रुंदीकरणामुळे मध्य नागपूर भंडारा रोडशी जोडले जाईल. त्यामुळे मध्यची पूर्वी नागपूरशी कनेक्टिव्हिटी उत्तम होईल. सध्या अनेक ठिकाणी हा रस्ता केवळ २० फुटाचा राहिला आहे.

 

Web Title: Property survey after the central line marking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.