कुख्यात चोरटा बनला मंदिराचा पुजारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 12:31 AM2018-06-03T00:31:08+5:302018-06-03T00:31:29+5:30

वाहनधारकांच्या डोळ्यात धूळ झोकून ठिकठिकाणी चोऱ्या करत फिरणारा नागपुरातील कुख्यात चोरटा छत्तीसगडमध्ये दडून बसला. तेथे तो चक्क एका मंदिरात पुजारी म्हणून काम करीत होता. या नाट्यमय घडामोडीची माहिती कळताच पाचपावली पोलिसांनी त्याला तेथे जाऊन अटक केली आणि खळबळ उडवून दिली.

The priest of the temple became the notorious thief | कुख्यात चोरटा बनला मंदिराचा पुजारी

कुख्यात चोरटा बनला मंदिराचा पुजारी

Next
ठळक मुद्देछत्तीसगडमध्ये अटक : पाचपावली पोलिसांची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाहनधारकांच्या डोळ्यात धूळ झोकून ठिकठिकाणी चोऱ्या करत फिरणारा नागपुरातील कुख्यात चोरटा छत्तीसगडमध्ये दडून बसला. तेथे तो चक्क एका मंदिरात पुजारी म्हणून काम करीत होता. या नाट्यमय घडामोडीची माहिती कळताच पाचपावली पोलिसांनी त्याला तेथे जाऊन अटक केली आणि खळबळ उडवून दिली.
शकील पठाण शरीफ पठाण (वय ३६) असे आरोपीचे नाव आहे. तो यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतो. कुख्यात वाहनचोरटा असलेल्या शकीलविरुद्ध पाचपावली ठाण्यात वर्षभरापूर्वी वाहन चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. तो १० महिन्यांपासून छत्तीसगडमधील डोंगरगडमध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांचे पथक डोंगरगडमध्ये पोहचले. त्यांनी शकीलचा पत्ता शोधून काढला. मात्र, पोलीस तेथे जेव्हा पोहचले तेव्हा शकीलचे रूप पाहून काही वेळेसाठी पोलीसही चक्रावले. आरोपी शकील भगवा फेटा बांधून कपाळावर टिळा लावून होता. तो एखाद्या पंडितसारखा दिसत होता. दशरथ ठाकूर नामक व्यक्तीच्या घरी तो भाड्याने राहायचा. त्याने स्वत:चे नाव रजनिश सिंग असे सांगितले होते. त्याच नावाने तो एका मंदिरात पुजारी म्हणून काम करीत होता. त्याचे हे रूप आणि व्यवसाय पाहून पोलीस चाट पडले. त्यांनी त्याला ताब्यात घेऊन नागपुरात आणले. त्याच्याकडून एक अ‍ॅक्टिव्हा, एक स्कुटी पेप आणि एक मोबाईल जप्त करण्यात आला.
परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर, सहायक आयुक्त वालचंद्र मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचपावलीचे ठाणेदार नरेंद्र हिवरे, पोलीस निरीक्षक रवींद्र दुबे, उपनिरीक्षक आर. इंगळे, हवालदार संजय वानखेडे, नायक सारिपुत्र फुलझेले, शैलेंद्र चौधरी, अविराज भागवत, सचिन भिमटे यांनी ही कामगिरी बजावली.
---
जॉली एलएलबीची आठवण
कुख्यात शकीलची अटक जॉली एलएलबी या चित्रपटातील कथानकाची आठवण करून देणारी आहे. जॉली एलएलबी या चित्रपटातील एक काश्मिरी गुन्हेगार स्वत:ची ओळख लपविण्यासाठी वेशांतर करतो. मुस्लीम असून तो स्वत:ला पंडित असल्याचे सांगतो. मात्र, न्यायालयात दाखल झालेले पोलीस त्याचा बुरखा फाडतात. शकीलचा बुरखा अशाच प्रकारे पाचपावली पोलिसांनी फाडला आहे.
---

Web Title: The priest of the temple became the notorious thief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.