संघाच्या व्यासपीठावरून प्रणव मुखर्जींनी दिले देशभक्ती आणि लोकशाहीचे धडे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2018 08:13 PM2018-06-07T20:13:11+5:302018-06-07T21:08:19+5:30

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या  तृतीय वर्ष प्रशिक्षण वर्गाच्या समारोप समाऱंभासाठी संघस्थानी आलेले माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या भाषणास सुरुवात झाली आहे.

Pranab Mukherjee LIVE News | संघाच्या व्यासपीठावरून प्रणव मुखर्जींनी दिले देशभक्ती आणि लोकशाहीचे धडे

संघाच्या व्यासपीठावरून प्रणव मुखर्जींनी दिले देशभक्ती आणि लोकशाहीचे धडे

Next

नागपूर -  नागपूरमधील संघस्थानी प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या प्रणव मुखर्जी यांनी संघाच्या व्यासपीठावरून देशभक्ती आणि लोकशाहीचे धडे दिले. भारतातील विविधता, हजारो वर्षांपासूनची समृद्ध संस्कृती, लोकशाहीचा वारसा, यांचा उल्लेख करत विविधतेच एकता हेच भारताचे सौंदर्य असल्याचे प्रणव मुखर्जी यांनी सांगितले. तसेच विविधता असली तरी भारतीय हीच आपली ओखळ असली पाहिजे असे त्यांनी अधोरेखित केले. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या  तृतीय वर्ष प्रशिक्षण वर्गाच्या समारोप समाऱंभासाठी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. कॉंग्रेसच्या विचारधारेतून घडलेले प्रणव मुखर्जी यावेळी स्वयंसेवकांना नेमके काय उद्बोधन करणार, याकडे देशाच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. प्रणव मुखर्जी यांनीही आपल्या संबोधनामधून देशाच्या समृद्ध इतिहासाला उजाळा देतानाच विविधतेत एकतेची ताकद अधोरेखित करून सध्याच्या काळात येत असलेल्या हिंसाचाराच्या घटनांवर टीकास्र सोडले.  

लोकशाहीत राष्ट्रीय महत्वाच्या मुद्द्यांवर सार्वजनिक चर्चा झाली पाहिजे . चर्चेतून जाटिल समस्या दूर होऊ शकतात . महिलेवर अत्याचार होतो तेव्हा देशाच्या आत्मा जखमी होतो . हिंसाचार वाढतो आहे, देशात शाब्दिक व शारीरिक हिंसा व्हायला नको . संताप, हिंसा यापासून दूर जायला हवे . लोकशाहीत जनता ही केंद्रस्थानी असली पाहिजे. जनतेमधील एकता तोडण्यासाठी काहीही होता काम नये . सरकारचे लक्ष्य गरिबी दूर करणे , व आर्थिक विकासातून विकास साधणे हे असले पाहिजे . देशात एकात्मता वाढीस लागावी व आनंदी वातावरण वाढावे हे धोरण तयार करताना लक्षात घ्यायला हवे, असे  प्रणव मुखर्जी यांनी आपल्या भाषणातून सांगितले.  
 

प्रणव मुखर्जी यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे 

- जनतेच्या आनंदामध्येच सत्ताधाऱ्यांनी आनंद मानला पाहिजे 

-  महात्मा गांधींनी सांगितल्याप्रमाणे भारतीय राष्ट्रवाद भारतीय राष्ट्रवादास  आक्रमक किंवा विनाशकारी नव्हता 

- कुठल्याही प्रकारच्या हिंसेपासून समाजाने दूर राहण्याची गरज 

- चर्चेच्या माध्यमातूनच विविध विचारसरणी मानणाऱ्यांच्या समस्यांवर तोडगा काढता येईल

- भारताला लोकशाही भेट म्हणून मिळालेली नाही 

- विविधता असूनही भारतीयता ही आमची ओळख

- हिंदू, मुस्लिम, शीख, ईशाई मिळून या देशाची ओळख पूर्ण होते, अनेक धर्म, वर्ण, भाषा हीच भारताची खरी ओळख 

- भाषा, वर्ण, धर्म आणि जातीमुळे राष्ट्रवाज प्रभावित होऊ शकत नाही 

- लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार असल्याचा नारा दिला 

- शेकडो वर्षांच्या परचक्रानंतरही आपल्या देशातील 5 हजार वर्षे जुन्या संस्कृतीला कुठलाही आक्रमक आणि  शासक संपवू शकला नाही

- असहिष्णुतेमुळे आपल्या देशाची राष्ट्रीय ओळख धुळीस मिळते

- बौद्ध धर्माची देणगी भारतानेच जगाला दिली 

- युरोप आणि अन्य जगापूर्वीपासून भारत एक देश होता 

- वसुधैव कुटुंबकम हीच भारतीय राष्ट्रवादाची प्रेरणा

- विविधतेत एकता हेच भारताचे सौंदर्य 

- 1800 वर्षांपूर्वीपर्यंत भारत हे जगासाठी शिक्षण केंद्र

- देशासाठी समर्पण हीच देशसेवा 

- राष्ट्रवाद आणि देशभक्तीवर बोलण्यासाठी येथे आलो आहे 

Web Title: Pranab Mukherjee LIVE News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.