नागपुरात पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त ,दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 11:32 PM2018-10-29T23:32:27+5:302018-10-29T23:34:14+5:30

जरीपटका पोलिसांनी एका कुख्यात गुन्हेगारासह दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून पिस्तूल आणि पाच जिवंत काडतूस जप्त केले.

Pistols and live cartridges were seized in Nagpur, both arrested | नागपुरात पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त ,दोघांना अटक

नागपुरात पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त ,दोघांना अटक

googlenewsNext
ठळक मुद्देजरीपटका पोलिसांची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मनीष नरेश मेश्राम (वय ३५, रा. रिपब्लिकननगर जरीपटका) आणि अजय पतीराम शर्मा (वय ४५, रा. देवीनगर, वाठोडा) अशी आरोपींची नावे आहेत.
मनीष हा गुन्हेगारी वृत्तीचा आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वीही पोलिसांनी गुन्हे दाखल करून त्याला अटक केली आहे. तो अजय शर्माच्या माध्यमातून पिस्तुलाची विक्री करत असल्याची माहिती कळताच पोलिसांनी सापळा रचून या दोघांना ग्रामीण पोलीस मुख्यालयाजवळच्या एका टपरीवर पकडले. त्यांची झडती घेतली असता मनीषजवळ पिस्तूल आणि शर्माजवळ पाच काडतूस आढळले. हे पिस्तूल, काडतूस आणि त्यांची दुचाकी पोलिसांनी जप्त केली. एका ट्रकचालकाकडून आपण ५०० रुपयात हे पिस्तूल विकत घेतल्याचे मनीषने पोलिसांना सांगितले आहे. त्याची गुन्हेगारी वृत्ती लक्षात घेता तो दिशाभूल करीत असल्याचे पोलिसांना वाटते. विशेष म्हणजे, अजय शर्मा हा शेअर ब्रोकिंगचे काम करतो. त्याचे कुख्यात मनीषसोबत पिस्तुलासह सापडणे पोलिसांना खटकते आहे. या प्रकरणाचा दुसरा पैलू असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.

तीन दिवसात दुसरी कारवाई
जरीपटका पोलिसांनी तीन दिवसात पिस्तूल पकडण्याची दुसरी कारवाई केलेली आहे. त्यांनी २५ आॅक्टोबरला कामठी मार्गावरील मनींदरसिंग चंडोक (वय ४४) याला अटक करून त्याच्याकडून पिस्तूल जप्त केले होते. पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार पराग पोटे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे, उपनिरीक्षक संजय चप्पे, हवालदार बंडू कळंबे, नायक रोशन तिवारी, प्रकाश बाळबुधे आणि लक्ष्मण चवरे यांनी ही कामगिरी बजावली.
 

Web Title: Pistols and live cartridges were seized in Nagpur, both arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.