मेडिट्रिनाच्या पालतेवाराची पोलिसांनाही भूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 12:17 AM2019-01-30T00:17:12+5:302019-01-30T00:18:13+5:30

रंभी मित्र, नंतर भागीदार त्यानंतर रुग्ण तसेच त्यांचे नातेवाईक आणि शासकीय यंत्रणेला भूल देणारे मेडिट्रिना हॉस्पिटलचे डॉ. समीर पालतेवार यांनी पोलिसांनाही भूल दिली आहे. सात दिवस होऊन आणि डॉ. पालतेवारांचा पत्ता, संपर्क माहीत असूनही पोलीस त्यांना अटक करण्याऐवजी हातावर हात धरून बसले. त्यामुळे डॉ. पालतेवारने पोलिसांना भूल दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Paltewara of Mediterina misguide the police | मेडिट्रिनाच्या पालतेवाराची पोलिसांनाही भूल

मेडिट्रिनाच्या पालतेवाराची पोलिसांनाही भूल

Next
ठळक मुद्देअटक करण्यासाठी टाळाटाळ : कारण गुलदस्त्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रारंभी मित्र, नंतर भागीदार त्यानंतर रुग्ण तसेच त्यांचे नातेवाईक आणि शासकीय यंत्रणेला भूल देणारे मेडिट्रिना हॉस्पिटलचे डॉ. समीर पालतेवार यांनी पोलिसांनाही भूल दिली आहे. सात दिवस होऊन आणि डॉ. पालतेवारांचा पत्ता, संपर्क माहीत असूनही पोलीस त्यांना अटक करण्याऐवजी हातावर हात धरून बसले. त्यामुळे डॉ. पालतेवारने पोलिसांना भूल दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.
शस्त्रक्रिया करण्यापूर्वी रुग्णाला संबंधित डॉक्टर भूल देतात. त्यामुळे काय होत आहे, ते रुग्णाच्या लक्षात येत नाही. डॉ. पालतेवार यांनी
रुग्णांचे नातेवाईक आणि शासकीय यंत्रणेच्या डोळ्यात धूळफेक करून कोट्यवधी रुपयांचा अपहार केला. पालतेवारांच्या देखरेखीत चाललेल्या मेडिट्रिना हॉस्पिटलमधील फसवणुकीची ठोस पुराव्यानिशी तक्रार गणेश चक्करवार या त्यांच्या भागीदारांनी सहा महिन्यांपूर्वी केली. मात्र, ठोस पुरावे असूनही गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाने गुन्हा दाखल करण्याचे टाळले. त्यामुळे चक्करवार यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने या प्रकरणात पोलिसांना २३ जानेवारीपर्यंत कारवाईचे निर्देश दिले. त्यामुळे पोलिसांनी २२ जानेवारीला डॉ. समीर पालतेवारविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याला आता सात दिवस झाले. या सात दिवसात डॉ. पालतेवारांनी केलेल्या फसवणुकीची अनेक प्रकरणे आणि स्वतंत्र तक्रारीही पुढे आल्या. रुग्णांच्या नातेवाईकांसोबतच पालतेवारांनी राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत अपहार केला. रुग्णांकडून बेकायदा रक्कम उकळली, बनावट नोंदी(व्हाऊचर)द्वारे हॉस्पिटलच्या खात्यातून पैसे काढले आणि बोगस दस्तावेज बनवून फसवणूक करण्याचाही सपाटा डॉ. पालतेवार यांनी लावल्याचेही उजेडात आले. पोलिसांनी डॉ. पालतेवारांच्या रुग्णालयातील कार्यालयात, निवासस्थानी, त्यांच्या काही साथीदारांकडे झाडाझडती घेतली. रुग्णालयातील लेखा विभागातून महत्त्वाची कागदपत्रे, संगणक, हार्डडिस्क जप्त केली. मात्र, एवढे सर्व करूनही पोलिसांनी पालतेवारांना अटक करण्यासाठी कचखाऊ भूमिका वठविल्याने पालतेवारांनी पोलिसांनाही ‘भूल’ दिल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
आज निर्णय होणार?
डॉ. पालतेवार यांनी स्वत:ची अटक टाळण्यासाठी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणूनही अर्ज सादर केला आहे. आधी सोमवारी होणार होती. मात्र, त्यावर मंगळवारी सुनावणी होईल, असे ठरले. त्यानुसार, न्यायालयात दोन्ही पक्षाकडून जोरदार युक्तिवाद झाला. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर जिल्हा सत्र न्यायाधीश अली यांनी निर्णय राखून ठेवला. बुधवारी यासंबंधाने निर्णय होण्याची शक्यता आहे.

Web Title: Paltewara of Mediterina misguide the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.