...अन्यथा सरकारने कांद्याला द्यावा ४ हजार भाव; विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी

By मंगेश व्यवहारे | Published: December 11, 2023 11:31 AM2023-12-11T11:31:57+5:302023-12-11T11:32:24+5:30

राज्यात कांदा निर्यातबंदीचा मुद्दा गाजत आहे. कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने सोमवारी विधानभवन परिसरात आंदोलन केले.

...otherwise the government should pay 4 thousand bhp for onion; Opposition leader Ambadas Danve's demand |  ...अन्यथा सरकारने कांद्याला द्यावा ४ हजार भाव; विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी

 ...अन्यथा सरकारने कांद्याला द्यावा ४ हजार भाव; विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी

नागपूर : केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी लावण्यापूर्वी कांद्याचा भाव प्रति क्विंटल ४००० ते ४२०० रुपये होतो. निर्यातबंदीनंतर कांद्याचा दर कमी होऊन १२०० ते १५०० रुपयांवर आला आहे. कांदा उत्पादन शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी राज्य सरकारने केंद्राच्या निर्यातबंदीचा विरोध करावा. अन्यथा राज्य सरकारने कांद्याला चार हजार रुपये भाव द्यावा, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवारी केली. 

राज्यात कांदा निर्यातबंदीचा मुद्दा गाजत आहे. कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने सोमवारी विधानभवन परिसरात आंदोलन केले. याप्रसंगी, ‘कांद्याचा वांदा करणाऱ्या सरकारकचा धिक्कार असो’, ‘कांद्याची निर्यातबंदी हटवलीच पाहिजे’, ‘या सरकारचे करायचे काय, खाली डोके वरती पाय’, ‘कांद्याला भाव मिळालाच पाहिजे’, ‘हल्लाबोल हल्लाबोल, मोदी सरकारवर हल्लाबोल,’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. आंदोलनात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री अनिल देशमुख, भास्कर जाधव, बंटी पाटील, विश्वजीत कदम, सचिन अहिर, प्रणिती शिंदे, रवींद्र धंगेकर, ऋतुराज गायकवाड, वर्षा गायकवाड पाटील आदींचा सहभाग होता. 

Web Title: ...otherwise the government should pay 4 thousand bhp for onion; Opposition leader Ambadas Danve's demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.