पहिल्या इंडियन फायर सर्व्हिस गेम्सचे नागपुरात आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 10:56 AM2018-02-03T10:56:49+5:302018-02-03T10:58:56+5:30

देशभरातील विविध राज्यात कार्यरत फायर फायटर्सना आपली प्रतिभा दाखविण्यासाठी आयोजित देशातील पहिल्या इंडियन फायर सर्व्हिस गेम्स २०१८चे शुक्रवारी थाटात उद््घाटन झाले.

Organizing the first Indian Fire Service Games in Nagpur | पहिल्या इंडियन फायर सर्व्हिस गेम्सचे नागपुरात आयोजन

पहिल्या इंडियन फायर सर्व्हिस गेम्सचे नागपुरात आयोजन

Next
ठळक मुद्देसत्काराने स्पर्धेला सुरुवातउद््घाटन समारंभात व्हिक्टोरिया पार्क येथे अग्नितांडवात इतरांचे प्राण वाचविण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या विजय पाल यांच्या श्रीमती विजय पाल यांचा सत्कार करण्यात आला.फायर फायटर्सच्या सहकार्यासाठी सदैव तत्पर असणारे व्हॅलेंटिअर पद्मश्री विपीन गणात्रा यांनाही सन्मानित करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशभरातील विविध राज्यात कार्यरत फायर फायटर्सना आपली प्रतिभा दाखविण्यासाठी आयोजित देशातील पहिल्या इंडियन फायर सर्व्हिस गेम्स २०१८चे शुक्रवारी थाटात उद््घाटन झाले. विभागीय क्रीडा संकुल, कोराडी मार्ग येथे शुक्रवारी हा कार्यक्रम झाला. राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेचे आयोजन देशात प्रथमच करण्यात आले असून आयोजनाचा मान नागपूरला मिळाला आहे, हे उल्लेखनीय.
स्पर्धेचे उद््घाटन सिव्हिल डिफेन्स/ होम गार्ड महासंचालक प्रकाश मिश्रा यांच्या हस्ते झाले. यावेळी उत्तर प्रदेश फायर सर्व्हिसचे संचालक पी.के. राव, एअरपोर्ट अ‍ॅथारिटी आफ इंडियाचे महाव्यवस्थापक सुभाष कुमार, नॅशनल फायर सर्व्हिस महाविद्यालयाचे संचालक शमिम, अतिविशिष्ट सेवा मेडलप्राप्त व नॅशनल फायर सर्व्हिस महाविद्यालयाचे प्रशासकीय संचालक डॉ. जी.एस.सैनी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी देशभरातील सुमारे दोन हजारावर फायर फायटर्स दाखल झाले आहते. यामध्ये अ‍ॅथ्लेटिक्स, बॅडमिंटन, टेबलटेनिस, फुटबॉल, व्हॉलिबॉल, अल्टीमेंट फायर फायटर्स अलाईव्ह, टग आफ वार, आर्म व्हेसलिंग, फायर फायटिंग अ‍ॅन्ड रेस्क्यू कॅम्पिटिशन, रोप रेस्क्यू कॅम्पिटिशन, फायर फायटिंग ड्रिल, पंप ड्रिल (४ व्यक्ती), बीए सेट ड्रिल आदी स्पर्धा होणार आहे. स्पर्धांचे आयोजन नॅशनल फायर सर्व्हिस महाविद्यालय व नॅशनल फायर सर्व्हिस गेम्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

 

Web Title: Organizing the first Indian Fire Service Games in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sportsक्रीडा