शिवस्मारकाच्या उंचीवरून विधानसभेत वादंग, विरोधी पक्षांनी केली घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 01:12 PM2018-07-17T13:12:18+5:302018-07-17T13:25:31+5:30

सर्व विरोधी पक्षांनी मिळून या निर्णयाचा निषेध करीत सभात्याग केला

Opposition questions govt’s move to ‘reduce’ height of Shivaji statue in Arabian Sea | शिवस्मारकाच्या उंचीवरून विधानसभेत वादंग, विरोधी पक्षांनी केली घोषणाबाजी

शिवस्मारकाच्या उंचीवरून विधानसभेत वादंग, विरोधी पक्षांनी केली घोषणाबाजी

Next

नागपूर : मुंबईच्या अरबी समुद्रात उभ्या केल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या सरकारने कमी केलेल्या उंचीवरून विधानसभेत विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. सर्व विरोधी पक्षांनी मिळून या निर्णयाचा निषेध करीत सभात्याग केला व सभागृहाच्या पायऱ्यांवर येऊन जोरदार घोषणाबाजी केली.

मनुवादी सरकारचा धिक्कार असो, तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय जिजाऊ, जय भवानी जय शिवाजी यासह सरकारच्या नाकर्तेपणाविषयीच्या अनेक घोषणा देत विरोधकांनी परिसर दुमदुमून टाकला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी सरकाराचा निषेध केला.

Web Title: Opposition questions govt’s move to ‘reduce’ height of Shivaji statue in Arabian Sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर