काँग्रेसचा एक गट दिल्लीत दुसरा नागपुरात सक्रिय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 12:05 AM2019-01-23T00:05:25+5:302019-01-23T00:07:47+5:30

माजी खासदार विलास मुत्तेमवार व शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांचा गट आपल्या समर्थकांसह दिल्लीत डेरेदाखल झाला आहे. दोन दिवसात त्यांनी काँग्रेसचे नेते अहमद पटेल, मोतीलाल व्होरा व मुकुल वासनिक आदींच्या भेटी घेतल्या. हा गट दिल्लीत पोहचल्याने काँग्रेसमधील दुसरा गट शहरात सक्रिय झाला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी लोकसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी करीत असताना नागपुरात काँग्रेसचे नेते आपसात लढत असतील तर पक्षाला विजय कसा मिळेल, असा प्रश्न काँग्रेस विचाराच्या मतदारांना पडला आहे.

One group of Congress in Delhi another group active in Nagpur! | काँग्रेसचा एक गट दिल्लीत दुसरा नागपुरात सक्रिय!

काँग्रेसचा एक गट दिल्लीत दुसरा नागपुरात सक्रिय!

Next
ठळक मुद्देकसा होणार काँग्रेसचा विजय?

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : माजी खासदार विलास मुत्तेमवार व शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांचा गट आपल्या समर्थकांसह दिल्लीत डेरेदाखल झाला आहे. दोन दिवसात त्यांनी काँग्रेसचे नेते अहमद पटेल, मोतीलाल व्होरा व मुकुल वासनिक आदींच्या भेटी घेतल्या. हा गट दिल्लीत पोहचल्याने काँग्रेसमधील दुसरा गट शहरात सक्रिय झाला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी लोकसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी करीत असताना नागपुरात काँग्रेसचे नेते आपसात लढत असतील तर पक्षाला विजय कसा मिळेल, असा प्रश्न काँग्रेस विचाराच्या मतदारांना पडला आहे.
महापालिकेतील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्या नेतृत्वात व माजी पक्षनेता यशवंत कुंभलकर यांच्या अध्यक्षतेखाली या गटाची मंगळवारी आमदार निवास येथे बैठक झाली. यात मुत्तेमवार व ठाकरे यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविण्याचा निर्णय घेण्यात आला.
नागपूर लोकसभा मतदार संघात काँग्रेसची उमेदवारी माजी मंत्री नितीन राऊ त, सतीश चतुर्वेदी, प्रफुल्ल गुडधे, माजी खासदार गेव्ह आवारी वा माजी आमदार अशोक धवड यांना देण्यात यावी. सतीश चतुर्वेदी यांना पुन्हा काँग्रेस पक्षात घेण्यात यावे, शहर काँगे्रस अध्यक्षांना बदलविण्यात यावे. अशा आशयाचे ठराव या बैठकीत पारित करण्यात आल्याची माहिती तानाजी वनवे यांनी दिली.
यावेळी माजी नगरसेवक अरुण डवरे, कांता पराते, कमलेश समर्थ, नगरसेवक किशोर जिचकार, सुभाष खोडे, विजय बाभरे, संजय दुबे, आशया उईके, राजेश जरगर, मन्सूरखान, सतीश पाली, विनायक पौनीकर, देवराव तिजारे यांच्यासह काँग्रेसचे नगरसेवक उपस्थित असल्याची माहिती वनवे यांनी दिली.
शहर काँग्रेसच्या मतानुसार उमेदवार ठरावा
शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात दिल्लीत दाखल झालेल्या काँग्रेसच्या शिष्टमंडळाने सोमवारी महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे व ए.के.अ‍ॅन्थोनी यांची तर मंगळवारी काँग्रेसचे नेते अहमद पटेल, मोतीलाल व्होरा व मुकुल वासनिक आदींच्या भेटी घेऊन नागपूर लोकसभा मतदार संघातील पक्षाच्या उमेदवार शहर काँगे्रस कमिटीच्या मताने ठरविला जावा,अशी मागणी केली. दिल्लीतील शिष्टमंडळ बुधवारीही काँग्रेस नेत्यांच्या भेटी घेणार असून सायंकाळी नागपूरला परतणार आहे.
बडतर्फ चतुर्वेदी यांना उमेदवारी द्या
आमदार निवास येथील बैठकीत काँग्रेसच्या दुसऱ्या गटाने नागपुरात काँग्रेसची उमेदवारी नितीन राऊ त, प्रफुल्ल गुडधे,गेव्ह आवारी,अशोक धवड वा सतीश चतुर्वेदी यांना देण्यात यावी, अशा आशयाचा ठराव पारित केला. विशेष म्हणजे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्यावरील शाई फेक प्रकरणात सतीश चतुर्वेदी यांना काँग्रेस पक्षातून बडतर्फ करण्यात आलेले आहे. असे असतानाही तानाजी वनवे यांनी चतुर्वेदी यांना उमेदवारी मिळावी. अशा मागणी ठरावाच्या माध्यमातून केली असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

 

Web Title: One group of Congress in Delhi another group active in Nagpur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.