१४ एप्रिल रोजी मल्लिकार्जुन खरगे दीक्षाभूमीवर, योगी आदित्यनाथ यांची ८ रोजी सभा

By कमलेश वानखेडे | Published: April 6, 2024 08:05 PM2024-04-06T20:05:30+5:302024-04-06T20:06:32+5:30

उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा मेळावा

On April 14, Mallikarjun Kharge will hold a meeting at Diksha Bhoomi | १४ एप्रिल रोजी मल्लिकार्जुन खरगे दीक्षाभूमीवर, योगी आदित्यनाथ यांची ८ रोजी सभा

१४ एप्रिल रोजी मल्लिकार्जुन खरगे दीक्षाभूमीवर, योगी आदित्यनाथ यांची ८ रोजी सभा

नागपूर: नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघात पुढील काही दिवसांत राजकीय पारा चढण्याची चिन्हे आहेत. १० एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कन्हान येथे जाहीर सभा होत आहे. त्यापाठोपाठ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे १४ एप्रिल रोजी नागपुरात दीक्षाभूमीवर येणार आहेत. त्याच दिवशी रामटेक मतदारसंघात त्यांची जाहीर सभा होणार असून सभेचे ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही.

रामटेकचे शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी सिने अभिनेता गोविंदा हे दोन दिवसांपासून रोड शो करीत आहेत. शनिवारी हिंगणा व उमरेड या दोन विधानसभा मतदारसंघात गोविंदा यांचा रोड शो झाला. रविवारी ७ एप्रिल रोजी नागपुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा मेळावा होत आहे. दुपारी ४ वाजता वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित या मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे हे शिवसैनिकांमध्ये जोश भरणार आहेत.

सोबतच नाराज असलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांना कामाला लावणार आहेत. ८ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता पश्चिम नागपुरातील फ्रेण्डस कॉलनी येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा होत आहे. हिंदी भाषिक मतदारांसाठी ही सभा आयोजित करण्यात आली आहे.

Web Title: On April 14, Mallikarjun Kharge will hold a meeting at Diksha Bhoomi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.