दादासाहेब कुलगुरूच नव्हे तर सामाजिक विद्यापीठही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 06:47 PM2017-11-15T18:47:53+5:302017-11-15T18:54:06+5:30

लोकसेवेचा वसा घेत दादासाहेब काळमेघ यांनी नागपूर विद्यापीठाला सामाजिक चेहरा दिला. दादासाहेब कुलगरु तर होतेच मात्र ते चालतेबोलते सामाजिक विद्यापीठही होते, असे गौरवोद्गार भारतीय आयुर्र्विज्ञान परिषदेच्या अकॅडमिक परिषदेचे अध्यक्ष डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी काढले.

Not only Dada Saheb Vice-Chancellor but also the social university | दादासाहेब कुलगुरूच नव्हे तर सामाजिक विद्यापीठही

दादासाहेब कुलगुरूच नव्हे तर सामाजिक विद्यापीठही

Next
ठळक मुद्देजयंती महोत्सवात वेदप्रकाश मिश्रा यांचे गौरवोद्गारमाजी मंत्री वसंतराव धोत्रे अध्यक्षस्थानी


आॅनलाईन लोकमत

नागपूर : लोकसेवेचा वसा घेत दादासाहेब काळमेघ यांनी नागपूर विद्यापीठाला सामाजिक चेहरा दिला. दादासाहेब कुलगरु तर होतेच मात्र ते चालतेबोलते सामाजिक विद्यापीठही होते, असे गौरवोद्गार भारतीय आयुर्र्विज्ञान परिषदेच्या अकॅडमिक परिषदेचे अध्यक्ष डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी काढले.
स्व. दादासाहेब काळमेघ स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने दादासाहेब काळमेघ यांच्या ८५ व्या जयंती महोत्सवानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. शिवाजी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष आणि माजी मंत्री वसंतराव धोत्रे समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, माजी आमदार वसंतराव खोटरे, उपाध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे, डॉ.रामचंद्र शेळके, अ‍ॅड. कोषाध्यक्ष दिलीप इंगोले, शरद काळमेघ, हेमंत काळमेघ आदी मान्यवर उपस्थित होते.
माजी मंत्री धोत्रे यांनी डॉ. पंजाबराव देशमुखानंतर दादासाहेब काळमेघ यांनी केलेल्या कार्याचा गौरव करीत जुन्या आठवणींना उजाळा दिला. शरद काळमेघ यांनी शिवाजी शिक्षण संस्थेच्या ओजस्वी इतिहासाला उजाळा देत तिथे कारकीर्द गाजविणाऱ्या  अध्यक्षांच्या कामाला यावेळी सलामी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन भारसाकळे यांनी केले. दादासाहेब काळमेघ यांच्या जयंतीउत्सवानिमित्त आयोजित करण्यात येणाºया विविध कार्यक्रमांची माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. मंदा नांदूरकर तर पाहुण्यांचे आभार हेमंत काळमेघ यांनी मानले.

Web Title: Not only Dada Saheb Vice-Chancellor but also the social university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.