‘माझ्या कुटुंबातून कुणीही राजकारणात येणार नाही’

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2019 05:27 AM2019-02-03T05:27:31+5:302019-02-03T05:27:52+5:30

परिवारातून लीडर पैदा करणे हे आपल्याला मान्य नाही. माझ्या कुटुंबातून कुणीही राजकारणात येणार नाही, आणि मी येऊ देणारही नाही, असे केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी येथे स्पष्ट केले.

'No one from my family will come in politics' | ‘माझ्या कुटुंबातून कुणीही राजकारणात येणार नाही’

‘माझ्या कुटुंबातून कुणीही राजकारणात येणार नाही’

Next

नागपूर - परिवारातून लीडर पैदा करणे हे आपल्याला मान्य नाही. माझ्या कुटुंबातून कुणीही राजकारणात येणार नाही, आणि मी येऊ देणारही नाही, असे केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी येथे स्पष्ट केले.
नागपूर मेट्रो व महापालिकेच्या आॅरेंज सिटी मेट्रो मॉल तसेच दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदार संघातील रस्ते, वीज, पाणी आदी सर्व आधुनिक सुविधांच्या विकास कामांचा शुभारंभ शनिवारी जयताळा येथे झाला. त्यावेळी गडकरी बोलत होते. आम्हाला आमच्या मुलांच्या रोजगाराची अजिबात चिंता नाही. आम्हाला चिंता आहे ती केवळ बेरोजगार मुलामुलींना रोजगार कसा मिळवून देता येईल याची, असेही गडकरी म्हणाले.

Web Title: 'No one from my family will come in politics'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.