रुट कॅनलमध्ये नवा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 10:27 AM2018-10-27T10:27:11+5:302018-10-27T10:48:02+5:30

प्रसिद्ध ‘रुट कॅनल विशेषज्ञ’ व व्हीएसपीएम डेंटल कॉलेज अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरच्या दंतशल्यशास्त्र व रुट कॅनल विभागाच्या प्रमुख डॉ. प्रतिमा शेनॉय व डॉ. चेतना माकडे यांनी ‘फिलिंग’च्या निर्जंतुकीकरणावरच नवा शोध लावला आहे.

New search in the root canal | रुट कॅनलमध्ये नवा शोध

रुट कॅनलमध्ये नवा शोध

Next
ठळक मुद्देप्रतिमा शेनॉय व चेतना माकडे यांचे संशोधन पेटेंटसाठी केला अर्ज

सुमेध वाघमारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : किडलेल्या दातावर ‘रुट कॅनल’ दातासाठी वरदान ठरले आहे. मात्र, या उपचार पद्धतीत वापरण्यात येणारे ‘फिलिंग’ सामान्य भाषेत सिमेंट व वैद्यकीय भाषेत ‘गुट्टा पर्चा’चे निर्जंतुकीकरण झाले नसल्याने ‘रुट कॅनल’ अयशस्वी होण्याचा धोका असतो. याबाबत सर्व दंततज्ज्ञासमोर एक मोठा प्रश्न उभा राहायचा. प्रसिद्ध ‘रुट कॅनल विशेषज्ञ’ व व्हीएसपीएम डेंटल कॉलेज अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरच्या दंतशल्यशास्त्र व रुट कॅनल विभागाच्या प्रमुख डॉ. प्रतिमा शेनॉय व डॉ. चेतना माकडे यांनी याच्या निर्जंतुकीकरणावरच नवा शोध लावला आहे. या संशोधनला पेटेंट मिळविण्यासाठी अर्जही केला आहे.
विशेष म्हणजे, इंटरनॅशनल फेडरेशन आॅफ एन्डोडॉन्टिक्स असोसिएशनच्यावतीने नुकतेच कोरिया येथे ‘रुट कॅनल वर्ल्ड काँग्रेस’चे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत ६०वर देशांचे दंतरोगतज्ज्ञ व दंतशल्यचिकित्सक सहभागी झाले होते. यात डॉ. शेनॉय व डॉ. माकडे यांनी हा शोधनिबंध सादर केला.
‘लोकमत’शी बोलताना डॉ. शेनॉय म्हणाल्या, पिझ्झा, बर्गर, चॉकलेट्स, बिस्कीटचे सेवन वाढल्याने व रात्री झोपताना ब्रश करण्याचे महत्त्व अद्यापही न उमगल्याने दात किडण्याचे प्रमाण वाढले आहे. पूर्वी दातांना कीड लागली तर काढण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. मात्र दंतचिकित्सेमध्ये झालेल्या संशोधनामुळे ‘रुट कॅनल’ उपचार पद्धती पुढे आली आहे. परिणामी, सुंदर मोत्यांसारख्या दातांसाठी ते एक वरदान ठरले आहे. या उपचारपद्धतीत दाताच्या किडलेल्या भागावर ‘ड्रिल’ करून तो भाग काढून टाकला जातो. त्यानंतर त्याभागाची हायड्रोजन पॅराक्साईड किंवा सोडियम हायड्रोक्लोराईडने स्वच्छता केली जाते. खोल केलेला तो भाग ‘गुट्टा पर्चा’ने भरला जातो. परंतु या ‘फिलर’ला तापवून किंवा कुठल्या रसायनमध्ये बडवून निर्जंतुकीकरण अशक्य असायचे. यामुळे अनेक समस्या निर्माण व्हायचा. साधारण १० टक्के ‘रुट कॅनल’ अयशस्वी होण्यामागे निर्जंतुकीकरण हे एक कारण समोर यायचे. परंतु यावर पर्याय नव्हता. याला घेऊनच गेल्या काही वर्षांपासून संशोधन सुरू होते.

असे आहे संशोधन
डॉ. शेनॉय म्हणाल्या, वेगवेगळ्या वनस्पतीचा औषधांमध्ये वापर होतो. २०१३ मध्ये व्हीएसपीएम डेंटल कॉलेज अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरच्या परिसरात औषधी वनस्पतीचा बगिचा तयार केला. देशातील हा पहिला बगिचा असावा. दाताच्या उपचारात औषधी वनस्पतीचा उपयोग होत नाही. मात्र आम्ही त्यावर संशोधन सुरू केले. ‘गुट्टा पर्चा’च्या निर्जंतुकीकरण करण्यासाठी याचा वापर करता येईल का, याचा अभ्यास केला. यासाठी ‘लेमनग्रास’च्या तेलाचा उपयोग केला. तेलात ‘गुट्टा पर्चा’ बुडवून ठेवल्यास निर्जंतुकीकरण होत असल्याचे आढळून आले. हाच तो नवा शोध होता. या शोधामुळे या उपचारपद्धतीत १०० टक्के निर्जंतुकीकरण शक्य झाले. या संशोधनात हॉस्पिटलचा मोठा वाटा आहे, असेही डॉ. शेनॉय म्हणाल्या.

Web Title: New search in the root canal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य