नागपूर जिल्ह्यातील सावनेरनजीक अपघात : पिता-पुत्राचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 12:22 AM2019-04-02T00:22:28+5:302019-04-02T00:23:11+5:30

सावनेरजवळील भागिमाहरी बस थांब्याजवळ एका आयसर मालवाहू गाडीने दुचाकीवर स्वार असलेल्या पिता-पुत्राला धडक दिली. यात सुनील गजानन रामापुरे (४५) व मुलगा शर्म$न सुनील रामापुरे (१४) रा.भागिमाहरी यांचा मृत्यू झाला.

Near Savner in Nagpur district accident : Death of father-son | नागपूर जिल्ह्यातील सावनेरनजीक अपघात : पिता-पुत्राचा मृत्यू

नागपूर जिल्ह्यातील सावनेरनजीक अपघात : पिता-पुत्राचा मृत्यू

Next
ठळक मुद्देआयसर मालवाहक वाहनाने दिली धडक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (सावनेर) : सावनेरजवळील भागिमाहरी बस थांब्याजवळ एका आयसर मालवाहू गाडीने दुचाकीवर स्वार असलेल्या पिता-पुत्राला धडक दिली. यात सुनील गजानन रामापुरे (४५) व मुलगा शर्म$न सुनील रामापुरे (१४) रा.भागिमाहरी यांचा मृत्यू झाला.
सुनील रामापुरे यांचा मोठा मुलगा शर्मन हा नांदागोमुख येथे श्रीराम विद्यालयामध्ये शिकत होता. त्याला बस स्थानकावर सोडून देण्याकरिता सुनील हे एम. एच.३१ एन ६८८१ या दुचाकीने जात असताना नागपूरकडून पांढुर्ण्याच्या दिशेने जात असलेल्या आयशर मालवाहक गाडीने दुचाकीला धडक दिली. सुनील रामापुरे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर अपघातात गंभीर जखमी झालेल्या शर्मन याचा नागपूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान दुपारी मृत्यू झाला. मृत सुनील रामापुरे हे एका खासगी कंपनीत कामगार होते.

Web Title: Near Savner in Nagpur district accident : Death of father-son

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.