नागपुरात ३१ मार्च २०१९ पर्यंत पूर्ण होणार २४ बाय ७ प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 10:05 PM2018-07-17T22:05:04+5:302018-07-17T22:06:21+5:30

नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरास समप्रमाणात योग्य दाबाने व शुद्ध पाणी पुरवठा करण्याच्या हेतूने नागपूर शहरात २४ बाय ७ ही योजना राबवली जाात आहे. सध्या या योजनेची भौतिक प्रगती ७५.९२ टक्के इतकी असून, हा प्रकल्प ३१ मार्च २०१९ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत उपस्थित एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात वर्तविली आहे.

Nagpur will be completed by March 31, 2019, 24 by 7 projects | नागपुरात ३१ मार्च २०१९ पर्यंत पूर्ण होणार २४ बाय ७ प्रकल्प

नागपुरात ३१ मार्च २०१९ पर्यंत पूर्ण होणार २४ बाय ७ प्रकल्प

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्री : प्रकल्पाची भौतिक प्रगती ७५.९२ टक्के

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरास समप्रमाणात योग्य दाबाने व शुद्ध पाणी पुरवठा करण्याच्या हेतूने नागपूर शहरात २४ बाय ७ ही योजना राबवली जाात आहे. सध्या या योजनेची भौतिक प्रगती ७५.९२ टक्के इतकी असून, हा प्रकल्प ३१ मार्च २०१९ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत उपस्थित एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात वर्तविली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, हसन मुश्रीफ, भास्कर जाधव आदींनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. शहरातील अनेक वस्त्यांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत असून, पाणीटंचाई असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता.
यावर आपल्या लेखी उत्तरात मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, शहरातील अनेक भागांमध्ये जलवाहिन्या जुन्या व जीर्ण झाालेल्या आहेत. त्यामुळे काही भागात दूषित पाण्याच्या समस्या होत्या तसेच पाणीटंचाईचीही समस्या आहे. परंतु २४ बाय ७ अंतर्गत नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. बहुतांश कामे झाली असून उर्वरित कामे प्रगतिपथावर आहेत. ज्या ठिकाणी नवीन जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. तेथील दूषित पाणी व पाणीटंचाईची समस्या दूर झाली असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तरात स्पष्ट केले.

Web Title: Nagpur will be completed by March 31, 2019, 24 by 7 projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.