नागपूर विद्यापीठातील ब्लेझर, ट्रॅकसुट खरेदी घोटाळ्याची होणार चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 10:48 PM2018-11-16T22:48:30+5:302018-11-16T22:49:13+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागातर्फे करण्यात आलेल्या ब्लेझर, ट्रॅकसूट व कीटच्या खरेदीत घोटाळा झाला आहे. विद्यापीठाच्या पर्चेस कमिटीच्या बैठकीत ही बाब सिद्ध झाली. घोटाळा उघडकीस आल्यानंतर कमिटीने प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत.

Nagpur University's Blazer, track shut buying scandal, will be investigated | नागपूर विद्यापीठातील ब्लेझर, ट्रॅकसुट खरेदी घोटाळ्याची होणार चौकशी

नागपूर विद्यापीठातील ब्लेझर, ट्रॅकसुट खरेदी घोटाळ्याची होणार चौकशी

Next
ठळक मुद्देतपासासाठी होणार समितीचे गठन : विभागप्रमुखांनी दिले नाही समाधानकारक उत्तर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागातर्फे करण्यात आलेल्या ब्लेझर, ट्रॅकसूट व कीटच्या खरेदीत घोटाळा झाला आहे. विद्यापीठाच्या पर्चेस कमिटीच्या बैठकीत ही बाब सिद्ध झाली. घोटाळा उघडकीस आल्यानंतर कमिटीने प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत.
‘लोकमत’शी बोलताना कुलगुरु डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी या बाबीची पुष्टी केली आहे. ते म्हणाले, शनिवारी तपास समितीचे गठन करण्यात येईल. प्रकरणाचा निष्पक्ष तपास करण्यात येईल. जो दोषी असेल त्याच्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल. सोबतच खरेदी रद्द करण्यात येईल. सूत्रांनी सांगितले की, पर्चेस कमिटीच्या बैठकीत हा मुद्दा ठेवण्यात आला होता. बैठकीपूर्वी विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागाच्या संचालक डॉ. कल्पना वसंत जाधव यांना उत्तर मागण्यात आले होते. बैठकीत त्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणावर विचार करण्यात आला. दरम्यान त्यांचे उत्तर समाधानकारक नसल्याचे आढळून आले. प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, विभागाने विद्यापीठाच्या विविध चमूतील खेळाडूंसाठी ब्लेझर, ट्रॅकसूट व स्पोर्ट कीटची खरेदी केली होती. नियमानुसार तीन लाखापर्यंत खरेदीचा अधिकार विभागाला असतो. त्यापेक्षा अधिक रकमेची खरेदी करण्यासाठी निविदा काढणे आवश्यक आहे. निविदा मागविल्यानंतर सामानाच्या खरेदीसाठी कुलगुरुंची मंजुरी घेणे आवश्यक आहे. परंतु असे करण्यात आले नाही. निविदा काढण्यापूर्वीच सामान मागविण्यात आले. विना मंजुरी घेता एका व्यक्तीला कंत्राट देण्यात आले. सामानाचा पुरवठाही झाला आहे. बिलाला मंजुरी देण्यासाठी समितीसमोर ठेवण्यात आले. यावर बैठकीत उपस्थित सदस्यांनी आक्षेप घेतला. या बाबीची गंभीर दखल घेऊन समितीने खरेदीला मंजुरी देण्यास नकार दिला. सोबतच विभागाच्या संचालक डॉ. कल्पना वसंत जाधव यांना स्पष्टीकरण मागितले होते.

‘लोकमत’ने केला होता खुलासा
उल्लेखनीय बाब म्हणजे ‘लोकमत’ने याबाबत वृत्त प्रकाशित करून त्यात शारीरिक शिक्षण विभागातर्फे ब्लेझर, ट्रॅकसूट व की विना कुलगुरुच्या परवानगीने खरेदी केल्याचा उल्लेख केला होता. वृत्त प्रकाशित झाल्यानंतर विद्यापीठात खळबळ उडाली होती. कुलगुरु डॉ. काणे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आल्याचे स्पष्ट केले होते. पुढील बैठकीत हा विषय ठेवण्यात येणार आहे.

संचालकांनी घोटाळा झाल्याचे केले अमान्य
प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर ‘लोकमत’ने शारीरिक शिक्षण विभागाच्या संचालक डॉ. कल्पना वसंत जाधव यांच्याशी संपर्क साधला.त्यांनी खरेदीत घोटाळा झाला नसल्याचे सांगितले. सोबतच बैठकीत मंजुरीसाठी काही महत्त्वाचे कागदपत्र दिले नसल्याचे सांगितले. एकूण साहित्याची खरेदी ५ लाख १० हजार रुपयांची करण्यात आली आहे तर सूत्रांनुसार फक्त ब्लेझरची किंमत ५ लाख १० हजार आहे.

Web Title: Nagpur University's Blazer, track shut buying scandal, will be investigated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.