नागपूर रेल्वेस्थानक : दारूची तस्करी करणाऱ्या तीन महिलांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 09:45 PM2019-05-03T21:45:10+5:302019-05-03T21:46:25+5:30

दानापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेसमध्ये दारूची तस्करी करणाऱ्या  तीन महिलांना रेल्वे सुरक्षा दलाने शुक्रवारी दुपारी २.२० वाजता प्लॅटफार्म क्रमांक २ वरून अटक केली. अटक केलेल्या महिलांकडून दारुच्या १८८५० रुपये किमतीच्या २९० बॉटल जप्त करण्यात आल्या आहेत.

Nagpur Railway Station: Three women arrested for smuggling alcohol | नागपूर रेल्वेस्थानक : दारूची तस्करी करणाऱ्या तीन महिलांना अटक

नागपूर रेल्वेस्थानक : दारूची तस्करी करणाऱ्या तीन महिलांना अटक

googlenewsNext
ठळक मुद्देआरपीएफची कारवाई : सिकंदराबाद एक्स्प्रेसमधील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दानापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेसमध्ये दारूची तस्करी करणाऱ्या  तीन महिलांना रेल्वे सुरक्षा दलाने शुक्रवारी दुपारी २.२० वाजता प्लॅटफार्म क्रमांक २ वरून अटक केली. अटक केलेल्या महिलांकडून दारुच्या १८८५० रुपये किमतीच्या २९० बॉटल जप्त करण्यात आल्या आहेत.
रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त भवानी शंकर नाथ यांनी मादक पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी गठित केलेल्या चमूतील सदस्य उपनिरीक्षक हरीवंश सिंह, जसवीर सिंह, शेख शकील, अश्विनी मुळतकर हे शुक्रवारी दुपारी २.२० वाजता प्लॅटफार्म क्रमांक २ वर गस्त घालत होते. १२७९२ दानापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेसच्या एस ११ कोचमध्ये त्यांना तीन महिला चार बॅग घेऊन संशयास्पद स्थितीत आढळल्या. त्यांची चौकशी केली असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यांना आरपीएफ ठाण्यात आणले. त्यांनी आपले नाव सुनिता किशोर जाट (३६), अल्का नरेश जाट (४५), सीमा जितेंद्र जाट (४६) रा. हमापुर, जबलपूर असे सांगितले. त्यांच्या जवळील बॅगची तपासणी केली असता त्यात दारूच्या १८८५० रुपये किमतीच्या २९० बॉटल आढळल्या. जप्त केलेली दारू निरीक्षक रवी जेम्स यांच्या आदेशावरून कागदोपत्री कारवाईनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन करण्यात आली.

 

Web Title: Nagpur Railway Station: Three women arrested for smuggling alcohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.